Bakrid  
मुंबई

Bakrid : बोकडाच्या अंगावर 'अल्लाह' अन् 'मोहम्मद'! किंमत सव्वा कोटी; विक्रीच्या पैशातून बांधणार शाळा

शर्मिला वाळूंज

डोंबिवली - बकरी ईद जवळ आली असून अंबरनाथ येथे एका बोकडाची किंमत तब्बल सव्वा कोटी रुपये इतकी लावण्यात आलीये. या बोकडाच्या अंगावर 'अल्लाह' आणि 'मोहम्मद' ही दोन्ही नावे जन्मतः असून मालकाने त्याचे नाव शेरू असे ठेवले आहे. ही नावे शेरू च्या अंगावर असल्याने मालकानं त्याची 1 कोटी 12 लाख 786 रुपये इतकी किंमत ठेवलीय. शेरू च्या कुर्बाणीतून मिळणाऱ्या पैशाने गावी शाळा बांधण्याचे बोकड मालक शखिल शेख याचे स्वप्न आहे.

बकरी ईद काही दिवसांवर आली असल्याने बोकड्यांची मागणी वाढली आहे. अश्यातच एखाद्या बोकडयावर चंद्रकोर असेल, अल्लाह किंवा 786 लिहलेलं असेल तर अश्या बोकडयांना प्रचंड मागणी असते. मुस्लिम धर्मीय लोकं अश्या बोकडयांना मोठी किंमत देऊन खरेदी करतात. असाच एक बोकड अंबरनाथ येथे आहे. या बोकड्याच्या अंगावर जन्मत: 'अल्लाह' आणि 'मोहम्मद' असे उमटलेलं असल्याने याच्यावर मोठी बोली लागण्याची आशा मालकाला आहे.

अंबरनाथ येथील सिद्धार्थ नगरमध्ये शकील शेख हा परिवारासह राहतो. स्टेशन रोडवर कपड्यांचा स्टॉल लावणाऱ्या शकील याला बोकड आणि बकरी पाळण्याची आवड आहे. त्याच्या घरच्या बकरीला दीड वर्षांपूर्वी एक पिल्लू झालं, त्याचं नाव त्यांनी शेरू असं ठेवलं. या शेरूला लहानपणापासून अतिशय प्रेमाने वाढवत शकीलने मोठं केलं. या बोकडाच्या मानेवर नैसर्गिकरित्या 'अल्लाह' आणि 'मोहम्मद' असे शब्द लिहिलेले आहेत.

या बोकडाची खासियत पण वेगळी असून उंच पुरं शरीर, मोठं कपाळ व मजबूत बांधा आहे. त्याला फक्त दोन दात असून त्याचं वजन 100 किलो इतकं आहे. रोज सकाळ संध्याकाळ सफरचंद, द्राक्षे, बाजरी, मका, हरभरा असे पदार्थ खातो. शकील याने या आधीही त्याचा एक बकरा विक्रीसाठी ठेवला होता, ज्याची किंमत 12 लाखांपर्यंत होती. मात्र त्याने हा बोकड न विकता स्वतःच ईदला त्याची कुर्बानी दिली.

त्यानंतर आता शकीलने कुर्बानीसाठी शेरू याची किंमत 1 कोटी 12 लाख 786 रुपये इतकी ठेवली आहे. त्यामुळे हा 'शेरू' आता नेमका कितीची मजल गाठतो याची सर्वांना उत्सुकता आहे..!

शेरूला विकून आलेल्या पैशातून उत्तर प्रदेशातल्या आपल्या गावी शाळा बांधण्याचं शकीलचं स्वप्न आहे. ते पूर्ण होते का हे पहावे लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT