Balasaheb Thackeray & Narayan Rane  Sakal
मुंबई

Balasaheb Thackeray: "बाळासाहेबांचं आम्हाला वेड होतं"; ठाकरेंच्या आठवणीत रमले नारायण राणे

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची आज ९७ वी जयंती आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची आज ९७ वी जयंती आहे. यापार्श्वभूमीवर त्यांच्या तैलचित्राचं आनावरण विधानभवनात होत आहे. या कार्यक्रमाला उपस्थित केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उपस्थिती लावली.

यावेळी त्यांनी बाळासाहेबांप्रती जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी बोलताना ते बाळासाहेबांच्या आठवणीत रमले म्हणाले, आम्ही साहेबांचे कडवट, प्रामाणिक शिवसैनिक यांच्यापलिकडे होतो, साहेबांचं आम्हाला वेड होतं. (Balasaheb Thackeray birth Anniversary We were obsessed with Balasaheb says Narayan Rane)

राणे म्हणाले, माननीय बाळासाहेबांबद्दल बोलताना, कौतुक करताना त्यांना ज्यांनी अनुभवलं, त्यांच्या सहवासात होते त्यांना त्यांच्याबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार आहे. मला आजही असं वाटतं की साहेब आज हवे होते. माझ्या आयुष्यात कोणी नव्हतं. मी कोकणातील एका शेतकऱ्याचा मुलगा, शिक्षणासाठी मुंबईत आलो. १९६६ जेव्हा शिवसेनेचा जन्म झाला, तेव्हा मी १५ वर्षाचा असताना शिवसेनेचा सभासद व्हायला गेलो. त्यानंतर साहेबांची कोणतीही सभा मी सोडली नाही. साहेबांचा कडवट, प्रामाणिक शिवसैनिक यांच्यापलिकडे आम्ही होतो. साहेबांचं आम्हाला वेड होतं. आजच्या शिवसैनिकांबद्दल मी काही बोलणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT