मुंबई

"फक्त किस्से मोठे अन्..."; नितेश ऱाणेंचा घणाघात

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाचे नाव म्हणजे हिंदूहृदयसम्राट दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे. त्यांच्या राष्ट्रीय स्मारकाचं भूमिपूजन आज पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासहित उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आदित्य ठाकरे आणि सुभाष देसाई उपस्थित राहणार आहेत. भूमिपूजनासाठी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रित करण्यात आलेलं नाही. या मुद्द्यावरून भाजप आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली.

'आज मा. बाळासाहेब असते तर, पहिले आमंत्रण देवेंद्रजींना दिले असते. मा. बाळासाहेब मनाचा राजा माणूस! राजा होण्यासाठी मन मोठं लागतं, त्यांच्यानंतर... फक्त किस्से मोठे आहेत, मन खूप लहान झाली आहेत!', असं ट्वीट नितेश राणे यांनी केलं.

बुधवारी संध्याकाळी साडे पाच वाजता दादरच्या वीर सावरकर मार्गावरील महापौर निवासात स्मारकाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे. बाळासाहेबांचे सुपूत्र आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शुभहस्ते भूमिपूजनाचा हा कार्यक्रम पार पडणार आहे. मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत हा भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे यांना कार्यक्रमाचे निमंत्रण नाही. मात्र एमएमआरडीए म्हणजे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मंत्री एकनाथ शिंदे यांना राजशिष्टाचारामनुसार निमंत्रण देण्यात यायला हवे होते. त्यांनाही निमंत्रितांमध्ये सहभागी केलेले नसल्याने आश्चर्य वाटत असल्याचेही नितेश राणे यांनी ट्वीट म्हटले आहे.

शिवाजी पार्क येथील महापौर निवासात बाळासाहेबांचे राष्ट्रीय स्मारक व्हावे, यासाठी शिवसेना सुरुवातीपासून आग्रही होती. कारण दादर शिवाजी पार्क मैदानाशी शिवसेनेचं एक वेगळ नातं आहे. शिवाजी पार्कच हे मैदान बाळासाहेबांनी आपल्या सभांनी गाजवलं आहे. त्याच मैदानाजवळ बाळासाहेबांच भव्य स्मारक उभं राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cabinet Expansion : मोदी कॅबिनेटमध्ये होणार मोठा गेमचेंजर! सर्वांच्या नजरा 'या' दोन नावांवर, अमित शाहांच्या भेटीनंतर दिल्लीत खळबळ!

SBI Recruitment 2026: SBI मध्ये नोकरीची मोठी संधी! 84 पदांसाठी भरती; जाणून घ्या पात्रता आणि अर्जाची शेवटची तारीख

'लाल लाल कलरची बांगडी...'वर पाठराखीणच्या अभिनेत्रींचा भन्नाट डान्स; संजू राठोड म्हणाला, 'खूप भारी' Viral Video

Rohini Devba : पोरीसाठी बापानं बकरी विकून विमानाचं तिकीट काढलं; हरियाणाच्या 9 पैलवानांना धूळ चारणाऱ्या महाराष्ट्राच्या लेकीची जागतिक भरारी, पण पैशांअभावी अडलं 'स्वप्न'

FIFA World Cup: पुण्यापेक्षाही लहान देश, पण पराक्रम गाजवलाय मोठा! पदार्पणातच गाठली नॉकआऊट, आता मेस्सीच्या अर्जेंटिनाला देणार टक्कर

SCROLL FOR NEXT