Balasaheb Thackeray sakal
मुंबई

Dasara Melava 1994: नमाज बंद न झाल्याने रस्त्यावरील महाआरत्या पुन्हा सुरू! आठवणी बाळासाहेबांच्या; दस्तावेज 'सकाळ'चे

सकाळ डिजिटल टीम

राज्यातील सर्व मशिदीमधील इमामांना पेन्शन देण्याची योजना राज्य सरकारने आखली असल्याची आपली माहिती असून, राज्य सरकारचा हा प्रयत्न हाणून पाडा, असे आवाहन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९९४ साली शिवतीर्थावर जमलेल्या हजारो शिवसेना कार्यकर्त्यांना उद्देशून केले.

रस्त्यावरील नमाज अद्याप बंद न झाल्याने रस्त्यावरील महाआरत्या पुन्हा सुरू करण्याचा इशारा त्यांनी सरकारला दिला. दर वर्षीप्रमाणे दसऱ्यानिमित्त शिवतीर्थावर (शिवाजी पार्क) होणाऱ्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात, शिवसेनाप्रमुख बोलत होते.

राज्यातील सर्व इमामांना पेन्शनरूपाने एकूण किती रक्कम द्यावी लागेल, याबाबत राज्य सरकारने धर्मादाय आयुक्तांकडे विचारणा केली असून, इमामांना पेन्शन देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न शिवसेना मुळीच खपवून घेणार नाही, असे ठाकरे म्हणाले,

आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीचा भगवा झेंडा व युतीचे जमले नाही, तर एकट्या शिवसेनेचा भगवा विधानभवनावर फडकावण्याची शपथ त्यांनी कार्यकत्यांना दिली. आगामी निवडणुका शांततेत पार पडल्या नाहीत, तर देशात यादवी निर्माण होईल, असा इशाराही त्यांनी दिला.

दांडियावर आणि इतर हिंदू उत्सव व सणांवर पोलिस लादत असलेल्या निर्बंधांविषयी बोलताना शिवसेनाप्रमुख म्हणाले, "तत्कालीन पोलिस आयुक्त सामरा यांच्याशी झालेल्या तडजोडीप्रमाणे महाआरती बंद केल्यानंतर रस्त्यावरील नमाजही पोलिस बंद करणार होते; परंतु रस्त्यावरील नमाज अद्याप सुरूच आहेत. हे नमाज बंद झाले नाहीत, तर पुन्हा महाआरत्या सुरू केल्या जातील.

मुस्लिमांशी आपले वैर नसून, त्यांच्या नमाजाविरुद्ध आपण नाही. मात्र हिंदूंच्या बाबतीत एक न्याय व मुसलमानांना दुसरा न्याय; हिंदूंच्याच उत्सवांवर बंधने, हे यापुढे सहन केले जाणार नाही. मग महाआरतीवर खटले दाखल झाले, तरी त्याला व न्यायमूर्तींना आम्ही मानणार नाही, असे ते म्हणाले.

राज्य सरकार व मुख्यमंत्री शरद पवार यांच्यावर जोरदार टीका करताना ते म्हणाले, "देश व जनतेच्या हिताच्या असलेल्या खासगीकरणाला आमचा पाठिंबा राहील. परंतु मुख्यमंत्री व राज्य सरकारने चालविलेल्या खासगीकरणात त्यांच्या नातेवाइकांचाच स्वार्थ आहे.

अरुण गवळीप्रमाणे वसई-विरारचा डॉन भाई ठाकूर हाही एकेकाळी शिवसैनिक होता, हे त्यांनी कबूल केले. भाजपने जागा वाटपांच्या बाबतीत जास्तच ताठर भूमिका स्वीकारली, तर भाजप-शिवसेना युती तुटण्याची शक्यता त्यांनी वर्तविली. भाजपला कानपिचक्या देऊन, त्यांच्या सामर्थ्याची त्यांनी जाणीव ठेवावी, असे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Department : गुन्हेगारी कमी कशी व्हायची? मोक्का रद्द करतो, गुन्हेगारांच्या टोळीकडे पोलिसानेच मागितले ६५ लाख; सहाय्यक फौजदार निलंबित

दुर्मीळ घटना! नवजात बाळाच्या पोटात आढळला दुसरा गर्भ; जगभरात फक्त 200 प्रकरणांमध्ये नोंद, काय म्हणाले डॉक्टर?

Latest Marathi News Live Update : चंद्रकांत पाटलांना जाब विचारणार, घायवळ प्रकरणावरून रवींद्र धंगेकर आक्रमक

Solapur News: 'मूर्तिकारांच्या अतिक्रमित २० झोपड्या जमीनदोस्त'; महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक, मंडई विभागाची संयुक्त कारवाई

Pune News : बळकावलेल्या जमिनींपासून बंदूकीच्या गोळ्यांपर्यंत! पुणे पोलिसांनी निलेश घायवळभोवती आवळला फास, घरावर छापेमारी, हाती लागलं मोठं घबाड

SCROLL FOR NEXT