Bal Thackeray_Devendra Fadnvis 
मुंबई

फडणवीसच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार - संजय कुटे

देवेंद्र फडणवीस हेच या सर्व यशाचे सूत्रधार होते, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार हे देवेंद्र फडणवीसच आहेत, असं विधान भाजपचे आमदार संजय कुटे यांनी केलं आहे. त्याचबरोबर राज्यातील या सत्तांतराचे खरे सूत्रधार हे फडणवीसच होते, असा खुलासाही त्यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हा दावा केला आहे. (Balasaheb Thackerays true successor is Devendra Fadnavis says Sanjay Kute)

संजय कुटे म्हणाले, "महाराष्ट्राच्या इतिहासातील हे ऐतिहासिक सत्तानाट्य होतं. यामध्ये देवेंद्र फडणवीस या सर्व यशाचे सूत्रधार होते. त्यानंतर जे घडलं त्यामुळं भाजपतले काही लोक नाराज झाले असतील पण फडणवीसांचा सारखा त्यागमूर्ती असलेला नेता या महाराष्ट्राराष्ट्राला मिळाला याचं आम्ही भाग्य समजतो. सत्तेसाठी आम्ही हे केलेलं नाही. ज्या विचारांवर आम्ही जगतो आहे त्याला गेल्या अडीच वर्षात तडा जात होता. यामुळं हिंदुत्वाचे विविध विषय मागे पडत होते. सन २०१९ मध्ये फडणवीसांच्या नेतृत्वाखालील शिवसेना-भाजपचं सरकार लोकांनी निवडून दिलं होतं, ते हिंदुत्ववादी सरकार कोणत्याही परिस्थितीत पुनर्स्थापन व्हावं आणि हा विचार पुढे जावा यासाठी फडणवीसांनी मोठा त्याग केला. हा त्याग नगरसेवक किंवा ग्रामपंचायत सदस्य देखील करु शकत नाही. त्यामुळं हे ऐतिहासिक सत्तांतर झालं. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं की शिवसैनिक मुख्यमंत्री व्हावा. हे त्यांचं स्वप्न देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण केलं. त्यामुळं फडणवीसच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार आहेत.

जेव्हा सत्तांतराच्या घडामोडी घडत होत्या त्यावेळी त्या कोणालाही माहिती नव्हत्या. पुढील काही तासात काय घडतंय हे कोणालाही माहिती नव्हतं. त्यामुळं जेव्हा फडणवीस मुख्यमंत्री होणार नाहीत हे कळालं तेव्हा ही भावना उफाळून आली की असं कसं झालं. त्यामुळं भाजपच्या आमदारांनी केंद्रीय नेतृत्वाकडे विचारणा केली की, फडणवीस नसतील तर हे कसं काय होईल? पण फडणवीसांनी ठरवलं होतं की, मी सत्तेत राहणार नाही, २०२४ च्या निवडणुकीसाठी मी तयारी करेन. पण भाजपचे खासदार, आमदार यांनी केंद्रीय नेत्वाकडे याबाबत तक्रार केल्यानंतर त्यांनाही विनंतीवजा आदेश द्यावे लागले. तुमचं नेतृत्व मोठं आहे, पण एक कार्यकर्ता म्हणून तुम्हाला तिथं गेलचं पाहिजे, हा आदेश केंद्रीय नेतृत्वाकडून त्यांना देण्यात आला. त्यामुळं त्यांच्या इच्छेविरुद्ध फडणवीसांना हे पद स्विकारावं लागलं आणि सत्तेत सामिल व्हावं लागलं, असंही यावेळी संजय कुटे यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : चोरीच्या पैशातून चंगळ, ६ तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, १० वर्ष जंगलात लपून बसला; सराईत बाईकचोराला अशी झाली अटक

Latest Marathi Breaking News : शिवसेनेला मोठा धक्का; अजून काही नगरसेवक करणार भाजपमध्ये प्रवेश

Hotstar सब्स्क्रिप्शन पूर्णपणे फ्री! सोबत मिळणार 15GB डेटा, काय आहे हा धमाकेदार प्लॅन? जाणून घ्या

Mumbai CNG crisis: कसं होणार मुंबईचं? सीएनजी तुटवड्याने थबकली... ऑटोचं भाडं किती वाढलं? विमानतळावर जाण्यासाठी कॅबसुद्धा नाही

Gadhinglaj News: गडहिंग्लजमध्ये चार पक्षांची महाआघाडी एकत्र; राष्ट्रवादीविरोधात रंगणार थरारक लढत!

SCROLL FOR NEXT