Bhiwandi  sakal
मुंबई

Bhiwandi : बाळ्यामामा आधिकाऱ्यांवर भडकले, म्हणाले नागरिकांचा जीव वाचवा नाहीतर

Khardi : नदीच्या पुरात बाधित झालेल्या रहिवाश्यां सुरू केलेल्या तहसीलदार कार्यालयासमोरील उपोषणास भेट दिली

नरेश जाधव

भारंगी नदीपात्रातील अतिक्रमणे हटवून येथील स्थानिक रहिवाशांचा जिव वाचविणे महत्वाचे असून यात दोषी असणाऱ्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्याशी चर्चा करणार असल्याचे भिवंडीचे खासदार बाळ्यामामा उर्फ सुरेश म्हात्रे यांनी भारंगी नदीच्या पुरात बाधित झालेल्या रहिवाश्यां सुरू केलेल्या तहसीलदार कार्यालयासमोरील उपोषणास भेट दिली असता सांगितले. यावेळी पूरग्रस्तांच्या घरी व भारंगी नदीच्या पात्राचीत्यांनी पाहणी केली.

शहापूर तालुक्यातील भारंगी नदीला 7 जुलै रोजी आलेल्या पुरामुळे नदीशेजारील परिसरातील घरात पाणी घुसून लाखोंचे नुकसान झाले होते,मात्र हा पूर नदीपात्रात झालेल्या अतिक्रमणामुळेच आला असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. त्या अनुषंगाने 7 जुलै रोजी येथील पुरग्रस्तांनी भारंगी नदीवर ठिय्या आंदोलन केले होते.

त्यावेळी भिवंडीचे उपविभागीय अधिकारी अमित सानप यांनी सदरचे बांधकाम तात्काळ निष्कासित करण्याचे तोंडी आश्वासन दिले होते. या घटनेला आठ दिवस उलटले तरी केवळ नदीपात्रातील पूर्वेकडील गणेश घाटाचे अर्धवट बांधकाम नगरपंचायत प्रशासनाने निष्कासित करण्याची कारवाई केली आहे. मात्र उर्वरित अतिक्रमणे जैसे थे असल्याने येथील भारंगी नदी पूरग्रस्त संघर्ष समितीने अखेर 15 जुलै रोजी बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले आहे.

भारंगी नदीचे पुराचे पाणी नदीकाठावरील वस्तीत शिरून कारणीभूत ठरलेल्या नदीपात्रातील अतिक्रमण नगरपंचायतीची सर्व बांधकामे त्वरित जमीनदोस्त करून नदी पूर्ववत करणे, नदीच्या खोलीकरणाला मंजुरी देणे,नियम डावलून नदीपात्रात बांधकामे करण्यास परवानगी देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यावर चौकशी करून कारवाई करण्यात यावी, व पूरग्रस्तांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी आदी मागण्या यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.16 जुलै रोजी भिवंडी लोकसभा खासदार यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला आहे.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते संतोष शिंदे, कळंभे ग्रामपंचायत उपसरपंच अविनाश किरपण,सदस्य स्वप्नील भोईर,स्वाती धसाडे, रमेश वनारसे,कमलेश कुंदर, राजाराम डोंगरे, राम भोईर व गौतम गोडे तसेच भारंगी नदी पूरग्रस्त संघर्ष समितीमधील उपोषणकर्ते, पूरग्रस्त नागरिक यावेळी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News: मुंबई इंडियन्स सहावे जेतेपद पटकावणार का? एक गोष्ट जी वाढवू शकते टेंशन, जाणून घ्या त्यांची बेस्ट Playing XI

Pune News: पुण्यातील बुधवार पेठेतील पोलिसांची अल्पवयीन मुलींवरील कारवाई बेकायदेशीर; तथ्यशोध समितीचा आरोप, बालहक्कांचे उल्लंघन!

Share Market Trading: शून्य ब्रोकरेज की १००% लोभ? 'मोफत' ट्रेडिंग प्लॅटफॉर्म्सचे धक्कादायक वास्तव; गुंतवणुकीआधी नक्की वाचा

'साईबाबा मला दिसले...' संकर्षण कऱ्हाडे साईचरणी नतमस्तक, अनुभव सांगताना म्हणाला...

Ram Navami: राम नवमीला एक नाही तर चक्क दोन सार्वजनिक सुट्ट्या; योगींनी का घेतला हा निर्णय ?

SCROLL FOR NEXT