file photo 
मुंबई

हायटेक चोरी : फास्टॅगद्वारे बँकेला २० कोटींचा गंडा

सकाळवृत्तसेवा

मुंबई : फास्टॅगच्या माध्यमातून ऑनलाईन टोल भरणाऱ्यांची संख्या वाढत आहे. आता भामट्यांनी बॅंकेची ऑनलाईन यंत्रणेतील त्रुटींचा फायदा घेत 20 कोटी रुपयांच्या फास्टॅग खरेदीद्वारे ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर पोलिसांनी चेन्नईतून चौघांना अटक केली असली, तरी मुख्य आरोपी अद्याप हाती लागलेला नाही. 

महत्त्वाची बातमी : ठाणेकरांसाठी खुशखबर... अखेर "क्‍लस्टर'चे ठरले!

या प्रकरणी बॅंकेच्या तक्रारीवरून सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. एका अनोळखी व्यक्तीने 18 ते 24 जानेवारी 2020 या काळात बॅंकेची लेजर यंत्रणेतील त्रुटींचा फायदा घेत 4259 अनधिकृत व्यवहार केल्याचे लक्षात आले. त्या व्यवहारांद्वारे 19 कोटी 84 लाख रुपयांचे फास्टॅग खरेदी केल्याचे निष्पन्न झाले. काही प्रकरणांत आरोपींनी वाहनांचे चुकीचे "केवायसी' भरले असून परताव्याची मागणी केली. ही रक्कम आरोपींनी अन्य 500 खात्यात जमा केली. 

हेही वाचा ः शिवसेनेच्या वाघाने फाडले आशिष शेलारांचे कपडे, मुंबईत बॅनरबाजी..

या प्रकरणी पुरुषोत्तम रावण्णा (40), किरण मंजू (35), राजेश शिवण्णा (34) व रसण्णा ऊर्फ प्रकाश शिवण्णा (37) यांना सायबर पोलिसांनी चेन्नईतून अटक केली. हे सर्व आरोपी मूळचे कर्नाटकातील बंगळुरू परिसरातील आहेत. मुख्य आरोपीने प्रलोभन दाखवून या चौघांच्या बॅंक खात्यांचा वापर केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पोलिस आणखी दोघांचा शोध घेत असून, त्यात मुख्य आरोपीचा समावेश आहे. 

कोट्यवधी रुपयांची फसणूक झाल्याचे लक्षात आल्यावर बॅंकेने सायबर पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी बॅंक यंत्रणेतून गेलेल्या रकमेच्या माध्यमातून खातेदारांची माहिती मिळवली. त्या वेळी या आरोपींची माहिती सायबर पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तीन पथके पाठवून चार आरोपींना अटक केली. मुख्य आरोपी हाती लागल्यानंतरच अधिक माहिती मिळू शकेल, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. यापैकी पोलिसांना संबंधित खात्यातून 7 कोटींची रक्कम जप्त करण्यात यश आले. 

त्रुटींचा गैरफायदा 
तक्रारदार बॅंकेने नुकतीच ई-वॉलेटच्या माध्यमातून फास्टॅग खरेदीची सुविधा सुरू केली होती. त्यात मोबाईल ऍप्लिकेशनद्वारे फास्टॅग खरेदीचाही समावेश होता. त्यातील काही त्रुटींचा गैरफायदा घेऊन आरोपीने ही फसवणूक केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. त्यासाठी त्याने वर्षभर बॅंकेच्या लेजर यंत्रणेतही शिरकाव केला होता. या माध्यमातून मोठ्या प्रमाणात तोटा झाल्यानंतर बॅंकेने अंतर्गत तपासणी केली. 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारत-पाकिस्तानमध्ये तणाव पुन्हा वाढला; शहबाज शरीफांचा भारताला थेट इशारा, उमर अब्दुल्लांनीही पाकला सुनावलं

Independence Day Wishes in Marathi: "झंडा ऊँचा रहे हमारा..." स्वातंत्र्यदिनानिमित्त तुमच्या प्रियजनांना द्या खास मराठी शुभेच्छा आणि देशभक्तीपर संदेश!

Red Fort Flag Hoisting: भारताच्या 'या' दोन पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावर तिरंगाच फडकावला नव्हता; काय आहे इतिहास?

IPL: हार्दिक पंड्याला KKRची खुली ऑफर? माजी खेळाडू म्हणाला, ‘या’ संघात मिळेल नेतृत्वाची जबाबदारी; IPL 2027 आधी मोठ्या ट्रेडची चर्चा

Marathi News Live Updates : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मोठी घोषणा, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू स्थापन करणार नवा राजकीय पक्ष

SCROLL FOR NEXT