Shambhuraj Desai vs Sharad Pawar esakal
मुंबई

'शंभूराज देसाईंना शोधा आणि एक गावठी कोंबडा, वळगणीचे मासे बक्षीस जिंका'; शरद पवार गटाच्या 'या' बॅनरची जोरदार चर्चा

पालकमंत्री शंभूराज देसाई जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर फारसे येताना दिसत नाहीत.

शर्मिला वाळुंज

मुरबाडमधील भर बाजारपेठेत पालकमंत्री देसाई यांना शोधा आणि गावठी कोंबडा बक्षीस मिळवा, असा फलक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून लावण्यात आल्याने जिल्हाभर हा विषय चर्चेचा झाला आहे.

डोंबिवली : साहेब, आपला पत्ता कुठेच लागत नाही, तुम्ही जिथे असाल तिथून परत या. आम्ही तुम्हाला काहीही बोलणार नाही. जिथे कुठे असाल तुम्ही परत या आम्ही तुमची वाट पाहतोय, आपल्या जिल्ह्यात अनेक समस्या आहेत, असे म्हणत ठाणे जिल्ह्याच्या नागरिकांनी पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांना जिल्ह्याचा दौरा करण्याची साद घातली आहे.

एवढेच नाही तर पालकमंत्री शंभूराज देसाई यांना शोधा आणि एक गावठी कोंबडा वळगणीचे मासे बक्षीस जिंका, असा आशय असलेला बॅनर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) गटाचे मुरबाड तालुका अध्यक्ष दीपक वाघचौडे यांनी हा बॅनर लावला असून त्याची जोरदार चर्चा जिल्ह्यात होत आहे.

ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर फारसे येताना दिसत नाहीत. डोंबिवलीत अमुदान कंपनीत स्फोट Dombivli (Amudan Company Explosion) होऊन काही कामगार मृत्यू पावले. एवढी भीषण परिस्थिती जिल्ह्यात असताना देखील शिवसेना नेते आणि पालकमंत्री शंभुराज देसाई डोंबिवली एमआयडीसीत नाहीच, पण ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले नाहीत. पालकमंत्री देसाई हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खास विश्वासातले म्हणून ओळखले जातात. त्यामुळेच त्यांना साताऱ्याचे असूनही ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आल्याची चर्चा सुरवातीपासून आहे.

Thane District Guardian Minister Shambhuraj Desai

मात्र, जिल्हा विकास नियोजन समितीच्या बैठकीला उपस्थिती लावण्या व्यतिरिक्त ते फारसे कुठे दिसत नाहीत. जिल्हा विकास नियोजन समितीच्या बैठकीला उपस्थिती लावली, म्हणजे जिल्ह्यातील समस्या सुटल्या असे होत नाही. यासाठी जिल्ह्याचा दौरा करावा लागतो. पावसाळा सुरू झाला आहे. ठाणे जिल्ह्याच्या गावोगावी अनेक समस्या आहेत. त्या समजून घेण्यासाठी पालकमंत्री फिरत नसल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत. मुरबाडमधील भर बाजारपेठेत पालकमंत्री देसाई यांना शोधा आणि गावठी कोंबडा बक्षीस मिळवा, असा फलक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून लावण्यात आल्याने जिल्हाभर हा विषय चर्चेचा झाला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून मुंबई-नाशिक महामार्गावर वाहनांची तुफान वाहन कोंडी होत आहे. या महामार्गावर वासिंद, खातिवली, आसनगाव रेल्वे स्थानकाजवळील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सुरू असलेली कामे अतिशय संथगतीने सुरू असल्याच्या तक्रारी आहेत. आसनगाव-कसारा रेल्वे मार्गावरील नाशिक महामार्गावरील उड्डाण पूल मागील तीन वर्षांपासून रखडला आहे. या पुलावरील एका मार्गिकेतून वाहने धावतात. त्यामुळे माल वाहतूकदार, प्रवासी हैराण आहेत.

हे सर्व विषय का रखडले आहेत याची माहिती घेऊन त्यांना कामाला लावणे हे पालकमंत्री म्हणून शंभूराज देसाई यांचे काम आहे. पण, पालकमंत्री देसाई ठाणे जिल्ह्यात फिरकत नसल्याने राजकीय पक्षासह नागरिकांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्री देसाई यांना ठाणे जिल्ह्याचा विभागवार दौरा करून तेथील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याची, त्या मार्गी लावण्यासाठी सूचना करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'आता वेळ आलीये कार्यसम्राटांना घरी बसवण्याची...'; नाव न घेता शिंदेसेनेला घणाघाती टोला, ठाण्यात भाजपच्या बॅनरची चर्चा

INDW vs ENGW: हिदर नाईटचं शतक अन् इंग्लंडचं भारतासमोर विक्रमी लक्ष्य! गोलंदाजीत दीप्ती शर्मा चमकली

Mhada House Lottery: म्हाडा 'त्या' विजेत्यांची पुन्हा लॉटरी काढणार! कारण आलं समोर

Abhyanga Snana: अभ्यंग स्नानाची खरी पद्धत माहित आहे का? स्कंदपुराणात सांगितलेले आहेत त्यामागचे आरोग्यदायी रहस्य!

Wakad Sangvi News : 'झाडू' हाती घेत डॉक्टरांनी केली स्वच्छता; सांगवी प्राथमिक आरोग्य केंद्रात शिपाई नसल्याने वैद्यकीय अधिकारीच सफाईत

SCROLL FOR NEXT