Boat-Sinking
Boat-Sinking Photo
मुंबई

"मरण डोळ्यापुढे दिसलं..."; अधिकाऱ्याचा सांगितला भयानक अनुभव

विराज भागवत

टायटॅनिक सिनेमासारखा आमचा शेवट होणार असंच आम्हाला वाटत होतं

मुंबई: तौक्ते चक्रीवादळाचा (Cyclone Tauktae) तडाखा भारतातील किनारपट्टीलगतच्या राज्यांना बसला. महाराष्ट्रात (Maharashtra) कोकण किनारपट्टी आणि मुंबईच्या मरिन ड्राईव्ह परिसरात वादळाने धुमाकूळ घातला. वादळाचा इशारा देऊनही ONGC चा P305 हा बार्ज समुद्रात कार्यरत होता. या बार्जला वादळाचा तडाखा बसला आणि त्यातील सुमारे ५० हून अधिक लोकांना प्राण गमवावे लागले. INS कोची आणि INS कोलकाता या युद्धनौकांनी त्या बार्जवरील अनेकांना वाचवलं. त्यातील तीजु सेबॅस्टन या एका अधिकाऱ्याने अंगावर काटा आणणारा अनुभव सांगितला. (barge P305 Security Officer said I have seen my death just like titanic climax)

"आप्पा, मी सुरक्षित आहे. नौदलाच्या जवानांनी आणि युद्धनौकांनी आम्हाला वाचवलं. आता आम्ही मुंबईला चाललोय. पण आज मी मरण डोळ्यासमोर पाहिलं. टायटॅनिक सिनेमाच्या शेवटच्या सीनसारखं काहीसं आपल्यासोबत होणार असंच आम्हाला वाटत होतं पण आता आम्ही सुरक्षित आहोत. बाकी सगळं घरी आल्यावर सविस्तर सांगतो", अशा शब्दात P305 बार्जवरचे वाचलेले अधिकारी तिजु सबॅस्टन यांनी घरी फोन करून परिस्थितीची कल्पना दिली. जवळपास १० तास तो अधिकारी समुद्राच्या पाण्यात जीवनमरणाशी झुंज देत होता.

तीजु P305 बार्जवर सुरक्षा अधिकारी म्हणून कार्यरत होता. तो मुंबईच्या हॉस्पिटलमधून निघाला आणि शनिवारी दुपारी कोचीला आपल्या घरी पोहचला पण अद्याप तो मानसिक धक्क्यातून सावरलेला नाही. तिजुची पत्नी अलिशा स्वर्णा हिला त्याने बार्ज वादळात अडकण्याची काही तास आधीच मेसेज केला होता. तिजुचं बार्ज बुडतंय हे त्याच्या घरच्यांना कळलं तेव्हा त्यांनी त्याची माहिती मिळवण्याचे पूर्ण प्रयत्न केले पण त्यांना ते शक्य झालं नाही. अखेर तिजुने फोन केला आणि आपली खुशाली कळवली तेव्हा त्यांचा जीव भांड्यात पडला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM मोदींच्या द्वेषयुक्त भाषणाच्या आरोपावर काय कारवाई केली? न्यायालयाचा पोलिसांना सवाल! ५ जूनपर्यंत मागवला अहवाल

RCB vs CSK : पावसामुळे 5-5 किंवा 10-10 ओव्हरचा सामना झाला तर कसे असेल RCBचे गणित? जाणून घ्या समीकरण

Mallikarjun Kharge : ''राज्यात 'मविआ'ला कमीत कमी ४६ जागा मिळतील'' खर्गेंचा दावा; इंडिया आघाडीची पत्रकार परिषद

Pune-Delhi Flight : विमानाला धडक, चौकशीसाठी पथक;‘डीजीसीए’चे तीन सदस्य पुण्यात दाखल

VIDEO: "निवडणूक संपली, प्रचार संपला!"; रितेश आणि जिनिलियाचा व्हिडीओ पाहून खळखळून हसाल

SCROLL FOR NEXT