ऐरोली-कळवा उन्नत मार्गात येतोय ‘हा’ अडथळा  
मुंबई

ऐरोली-कळवा उन्नत मार्गात ठरतोय ‘हा’ अडथळा

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : कळवा-ऐरोली उन्नत मार्गाची घोषणा होऊन चार वर्षे उलटली असली, तरी अद्याप या प्रकल्पासाठीच्या जमीन संपादनाची प्रक्रियाच पूर्ण झालेली नाही. परिणामस्वरूप या प्रकल्पात अडथळा ठरणाऱ्या झोपड्यांच्या पुनर्वसनामुळे हा प्रकल्प रखडला आहे. त्यामुळे जमीन संपादनाचे काम रखडल्यामुळे हा प्रकल्प लांबणीवर जाणार आहे. 

2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऐरोली-कळवा उन्नत मार्गाचे मुंबई येथील एका कार्यक्रमातून रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून उद्‌घाटन करण्यात आले होते. एमयूटीपी तीन अंतर्गत भरीव निधीची तरतूद या प्रकल्पासाठी करण्यात आली असली, तरी जमीन अधिग्रहणाअभावी हा प्रकल्प रखडला आहे. अंदाजे 1.803 कि.मी.चा हा मार्ग असून या प्रकल्पासाठी 428 कोटींचा अंदाजित खर्च आहे. हा प्रकल्प 2019-20 पर्यंत पूर्ण करण्याचा कालावधी निश्‍चित करण्यात आला होता, परंतु जमीन संपादनाचे काम रखडल्यामुळे हा प्रकल्प लांबणीवर जाणार आहे. 

कल्याणकडून नवी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांना ठाणे स्थानकातून पुढे जावे लागत असल्याने ठाणे स्थानक गर्दीने ओसंडून वाहत आहे. मध्य आणि ट्रान्स हार्बरच्या गर्दीमुळे ठाणे स्थानकात प्रवाशांना लोकल गाड्यांमध्ये चढणेही अशक्‍य होते. ठाण्याची ही गर्दी कमी करण्यासाठी कळवा-ऐरोली उन्नत मार्गाचा प्रस्ताव 2015 च्या अर्थसंकल्पामध्ये मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर 2017 च्या आणि यंदाच्या अर्थसंकल्पामध्येही यासाठी भरीव तरतूद करण्यात आली. या प्रकल्पासाठी 1.803 कि.मी. जमीन लागणार असून, ठाणे महापालिकेच्या भोलानगर, न्यू शिवाजीनगर, मफतलाल कंपनी, ठाकूरपाडा या मार्गाने जाणार आहे. येथील जमीन संपादित करण्याचे काम रखडले आहे. प्रस्ताव रेल्वेकडून जिल्हा प्रशासनाच्या महसूल विभागाकडे सादर करण्यात आला होता. महसूल विभागाने या भूसंपादनाच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले, परंतु येथील झोपड्यांचे पुनर्वसन यामुळे येथील जमीन अधिग्रहणामध्ये अडचणी येत आहेत. हा प्रकल्प 2019-20 पर्यंत पूर्ण करण्याचा कालावधी निश्‍चित करण्यात आला आहे, परंतु जमीन संपादनाचे काम जैसे थे असल्यामुळे हा प्रकल्प लांबणीवर जाण्याची शक्‍यता आहे. 

झोपड्यांचा अडथळा 
याबाबत एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता ऐरोली-कळवा उन्नत मार्गामधील झोपड्यांचे पुनवर्सन करण्यासाठी जागेची उपलब्धता नसल्यामुळे ही प्रक्रिया रखडली आहे. हा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. खासदार राजन विचारे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कामात असून, नंतर फोन करून बोलतो असे सांगितले. 

कळवा-ऐरोली उन्नत मार्गामध्ये झोपड्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्‍न रखडला आहे. एमएमआरडीएकडून पुनर्वसनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्यानंतर या मार्गाचे काम मार्गी लावण्यात येईल. 
- एम. एस. खुराणा, एमआरव्ही अधिकारी. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Sharad Pawar : राष्ट्रवादीच्या निरीक्षकांचे कार्यकर्त्यांनी टोचले कान, गर्दी करण्यासाठी आम्हाला निरोप; नेते म्हणतात...

Amravati News : दहा दिवसांच्या बाळावर अघोरी उपचार; गरम विळ्याने दिले ३९ चटके अन्... मेळघाटातील धक्कादायक प्रकार

Tulsi Remedies Ekadashi: आषाढी एकादशीला करा तुळशीचे 'हे' उपाय सर्व मनोकामना होतील पूर्ण

Ashadhi Wari: विदर्भातून १५९४ मध्ये निघाली पहिली पालखी; १९३८ दिंड्या पंढरपुरात,रुक्मिणी संस्थान नंतर चंदाजी महाराज दिंडीचा समावेश

SCROLL FOR NEXT