बारवी प्रकल्पग्रस्त.jpg 
मुंबई

बारवी प्रकल्पग्रस्त नोकरीच्या प्रतीक्षेत! ऑर्डर निघूनही निर्णय नाही

मुरलीधर दळवी

मुरबाड : बारवी प्रकल्पग्रस्त 209 तरुणांना नोकरीच्या ऑर्डर 1 ऑक्‍टोबरपर्यंत मिळणार असल्याचे जाहीर झाले होते; मात्र अद्याप महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्फे (एमआयडीसी) एकाही तरुणाला नियुक्ती पत्र न मिळाल्याने नोकरी कधी मिळणार, असा प्रश्‍न प्रकल्पग्रस्त विचारत आहेत. 


उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते 29 सप्टेंबर रोजी मंत्रालयात पाच उमेदवारांना नोकरीचा आदेश देण्यात येईल आणि 1 ऑक्‍टोबरपर्यंत सर्व 209 उमेदवारांना ऑर्डर देऊन एमआयडीसीतर्फे नोकरीत सामावून घेण्यात येईल, 
अशी जाहीर घोषणा आमदार किसन कथोरे यांनी मुरबाड येथे आयोजित मेळाव्यात एमआयडीसी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत केली होती.  मेळाव्यात या तरुणांची नावे व नोकरीची पदेसुद्धा जाहीर केली होती; मात्र 29 सप्टेंबरला उद्योगमंत्री सुभाष देसाई हे मुंबईबाहेर दौऱ्यावर असल्याने तो कार्यक्रम रद्द झाल्याचे सांगण्यात आले.

त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना नोकरीची नियुक्ती पत्रे कधी देण्यात येतील, हे अद्यापही जाहीर करण्यात आले नाही. त्यामुळे नोकऱ्यांची नियुक्ती पत्रे कोणत्या शीतपेटीत बंद केली आहेत व ती तरुणांना कधी मिळणार, असा प्रश्न विचारला जात आहे. 


महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अधिकाऱ्यांनी नोकरीची नियुक्ती पत्रे देण्यासाठी उद्योग मंत्र्यांच्या भेटीची वेळ अगोदर निश्‍चित केली नाही. त्यामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलला गेला. येत्या पंधरा दिवसांत नोकरीचे नियुक्ती पत्रे देण्यात येतील, अशी माहिती एमआयडीसी अधिकाऱ्यांनी दिली.

 -  कमलाकर भोईर, अध्यक्ष, बारवी प्रकल्पपीडित संघटना

Barvi project victims do not have a letter of appointment from MIDC

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT