aditya thackeray  Sakal
मुंबई

BCCI Reply to Aditya Thackeray: "वर्ल्डकप फायनल मुंबई बाहेर नेऊ नका" म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना BCCIचं उत्तर

T20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर टीम इंडियाचं मुंबईत काल चाहत्यांनी तुफान गर्दीमध्ये स्वागत केलं.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : T20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर टीम इंडियाचं मुंबईत काल चाहत्यांनी तुफान गर्दीमध्ये स्वागत केलं. नरिम पॉईंट परिसरात आणि वानखेडे स्टेडियममध्ये हजारो चाहत्यांची उपस्थिती दाखवली. मुंबईकरांची क्रिकेटबाबतची ही क्रेझ पाहता मुंबईतून विश्वचषक फायनल कधीही मुंबईतून काढून घेऊ नका, अशा आशयाचं आवाहन ट्विटद्वारे शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी बीसीसीआयला केलं होतं. (BCCI Reply to Aditya Thackeray who said Never take away World Cup final from Mumbai)

आता आदित्य ठाकरे यांच्या ट्विटवर आता बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी भाष्य केलं आहे. त्यांनी म्हटलं की, "काल विजयी टीम इंडियाचं स्वागत करण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने आलेल्या मुंबईकरांचे मी आभार मानतो. पण फायनल कुठे घ्यायची हा फिरता विषय आहे. कोणत्याही एका शहराचा हा विषय नाही. कारण यापूर्वी कोलकात्यातही फायनल आयोजित केली गेली आहे. मुंबई शहरातही फायनल आयोजित केली गेली आहे.

अहमदाबादच्या स्टेडियमची क्षमता 1.30 लाखांहून अधिक आहे आणि आम्हीही त्या क्षमतेनुसार तिथं सामना आयोजित केला. फायनलसाठी तुम्ही एका ठिकाणापुरते मर्यादित राहू शकत नाही, पण अर्थातच मुंबईकरांचा प्रतिसाद पाहून आम्हाला खूप आनंद झाला. प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे आणि मुंबई आमच्या प्राधान्यक्रमावर आहे. पण विश्वचषकाच्या फायनल्स केवळ एकाच शहरात आयोजित केले पाहिजेत असं कोणत्याही देशात घडत नाही, असंही राजीव शुक्ला यांनी म्हटलं आहे.

आदित्य ठाकरेंनी काय केलं होतं ट्विट?

आदित्य ठाकरेंनी आज दुपारी १२ वाजता ट्विट केलं. यात त्यांनी म्हटलं की, "मुंबईतलं कालचं सेलिब्रेशन हा बीसीसीआयला मोठा संदेश आहे की, मुंबईतून कधीही वर्ल्डकप फायनल बाहेर नेऊ नका"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nirav Modi Extradition : नीरव मोदीला भारतात आणण्याच्या हालचालींना वेग; CBI अन् EDचे संयुक्त पथक लंडनला जाणार!

Baramati Election : बारामतीच्या न्यायालयाच्या निर्णयाविरोधात; निवडणूक आयोगाची उच्च न्यायालयात धाव!

IND vs SA, ODI: 'रोहित आणि मी अजूनही संघासाठी...', विराट मालिकावीर पुरस्कार जिंकल्यानंतर स्पष्टच बोलला; पाहा Video

Pune News : पुणे महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपच्या कोअर कमिटी बैठकीत पक्षप्रवेशावरून मतभेद होण्याची शक्यता!

Indigo Flight Chaos : विमानाच्या गोंधळामुळे आमदार रस्त्यावर; नागपूर अधिवेशनासाठी निघाले मोटारीने!

SCROLL FOR NEXT