bdd chawl sakal media
मुंबई

बीडीडी चाळींचा पुनर्विकास म्हाडाच्या कायद्याप्रमाणे करा; वरळीत उपोषण

तेजस वाघमारे

मुंबई : बीडीडी चाळींचा पुनर्विकास (BDD chawl redevelopment) म्हाडाच्या (Mhada) विकास नियंत्रण नियमावली 33 (5) नुसार करावा, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांकडे सरकारचे (Government) लक्ष वेधण्यासाठी अखिल बीडीडी चाळी सर्व संघटनांचा एकत्रित संघ संघटनेने गांधी जयंतीनिमित्त लक्षवेधी एकदिवसीय उपोषण (Strike) केले. वरळी येथील बीडीडी चाळ क्रमांक 60 व 61 समोर हे उपोषण करण्यात आले.

वरळी, नायगाव, ना. म. जोशी मार्गावरील बीडीडी चाळींचा भूमिपूजन सोहळा 22 एप्रिल 2017 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वरळी येथील जांबोरी मैदानात पार पडला. या प्रकल्पासाठी राज्य सरकारने म्हाडाची नोडल एजन्सी म्हणून निवड केली आहे. नायगाव येथील बीबीडी चाळीच्या पुनर्विकासाचे काम एल अँड टी या कंपनीला दिले आहे. ना. म. जोशी मार्गावरील बीडीडी चाळींच्या कामासाठी शहापूरजी अँड पालनजी या कंपनीला तर वरळी बीबीडीचे काम टाटा कंपनीला देण्यात आले आहे.

सरकारने बीडीडीवासीयांना 500 चौरस फुटांचे घर देण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार वरळी बीडीडी चाळींच्या ठिकाणी कामही सुरू झाले आहे. मात्र अखिल बीडीडी चाळी सर्व संघटनांचा एकत्रित संघ या संघटनेने विविध मागण्यांसाठी गांधी जयंतीदिनी उपोषण केले. वरळी येथील बीडीडी चाळ क्रमांक 60 व 61 समोर हे उपोषण करण्यात आले. या उपोषणात काही कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.

15 ते 25 लाखापर्यंत कॉर्पर्स फंड मिळवा, 33(5) कायदा म्हाडा वसाहतीना लागू आहे. तोच कायदा बीडीडी चाळींकरिता लागू करावा, या मागण्यांसाठी संघटना आग्रही असून सरकारने या मागण्यांचा गांभीर्याने विचार न केल्यास रहिवाशी रस्त्यावर उतरतील, असा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला. तर बीडीडी पुनर्विकासासाठी आग्रही असलेल्या संघटनांनी उपोषण कर्त्यांच्या मागण्या सरकारने कशा पूर्ण केल्या आहेत. याकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून लक्ष वेधून उपोषण कसे अयोग्य आहे, हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT