मुंबई

...या मार्गावरुन प्रवास करताना, जरा जपुन

सकाळ वृत्तसेवा

उरण : उरणमधील फुंडे महाविद्यालयाच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात मातीचे ढिगारे टाकण्यात आले आहेत. महानगर गॅसवाहिनीसाठी केलेल्या खोदकामामुळे रस्त्यावर मातीचे साम्राज्य झाले आहे. परिणामी, हा मार्ग वाहतुकीसाठी धोकादायक ठरत असून रस्त्यावरील माती लवकरात लवकर हटवावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा सरचिटणीस दिनेश म्हात्रे यांनी केली आहे.

महानगर गॅस प्रशासनाने सध्या उरणकरांच्या जिवाशी खेळण्याचा निर्णय घेतला असल्याचे भयानक चित्र समोर येत आहे. रस्त्यावरील वाहतुकीला धोकादायक ठरणारे चिखल-मातीचे ढिगारे तत्काळ हटविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग; तसेच महानगर गॅसच्या प्रशासनाने पुढाकार घेणे अपेक्षित होते; मात्र प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे.

उरण तालुक्‍याचे औद्योगिकीकरण झपाट्याने वाढत आहे; मात्र वाढत्या औद्योगिकीकरणाबरोबरच येथील समस्यांमध्येही वाढ होत आहे. तालुक्‍यातील सरकारी अधिकाऱ्यांवर लोकप्रतिनिधींचा कोणताही वचक नसल्यामुळे अधिकारीवर्ग सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरत आहे. त्यामुळे उरणकरांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशातच उरणकरांसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या पनवेल-उरण या रहदारीच्या रस्त्यालगतच पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी आणि महानगर गॅसवाहिनी टाकण्याचे काम संबंधित ठेकेदारांनी हाती घेतले आहे. त्यामुळे रस्त्यावर खोदकाम करण्यात आले आहे. 

हे पण वाचा : घर देता का घर...

ठेकेदारांनी खोदकामातील माती रहदारीच्या रस्त्यावर टाकल्याने रात्रीच्या वेळेस अपघात होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे अपघाताला कारणीभूत ठरणारे मातीचे ढिगारे तत्काळ हटविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग व महानगर गॅसच्या प्रशासनाने पुढाकार घ्यावा. तसेच उरण-पनवेल रस्त्याचे रुंदीकरण करताना टाकण्यात येणारी महानगर गॅसवाहिनी भविष्यात धोकादायक ठरणार आहे.
- दिनेश म्हात्रे, जिल्हा सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

रस्त्यात जर माती टाकण्यात आली असेल, तर प्रथम पाहणी करण्यात येईल. त्यानंतर महानगर गॅसवाहिनी टाकणाऱ्या ठेकेदारास माती काढण्याबाबत सांगण्यात येईल. 
-  एन. बी. भोये, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, उरण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT