tejas.png 
मुंबई

वाढत्या कोरोनामुळे तेजस एक्सप्रेस बंद करण्याचा निर्णय

सकाळवृत्तसेवा

मुंबई : रेल्वे मंत्रालय आणि इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टुरिझम कॉपोर्रेशन (आयआरसीटीसी) यांच्यावतीने चालविण्यात येणारी मुंबई ते अहमदाबाद खासगी तेजस एक्सप्रेस 2 एप्रिलपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत वाढत्या कोरोनाचा रुग्णांमुळे रात्रकालीन संचारबंदी लावण्यात आली आहे. त्यामुळे पुढील आदेश मिळेपर्यंत तेजस एक्स्प्रेस बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आयआरसीटीसीकडून देण्यात आलेली आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूवीर देशात धावणार्‍या आयआरसीटीसीच्या तिन्ही खासगी ट्रेन सुद्धा रद्द करण्यात आल्या होत्या. ज्यात मुंबई- अहमदाबाद तेजस एक्स्प्रेस, दिल्ली-लखनऊ तेजस एक्स्प्रेस आणि काशी महाकाल एक्स्प्रेसचा समावेश आहे. मात्र,  अनलॉकमध्ये मुंबई ते अहमदाबाद दरम्यान धावणारी खासगी तेजस एक्सप्रेस 17 ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आली होती. 

मात्र यावेळी प्रवाशांचा प्रतिसाद न मिळाल्याने  पुन्हा एकदा खासगी तेजस बंद करण्यात आली होती. त्यानंतर 14 फेब्रुवारी  रोजी मुंबई-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेस सुरू केली होती. मात्र, आता मुंबईत कोरोनाची दुसरी लाट आल्याने कोरोनाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून मुंबईसह संपूर्ण राज्यात संचार बंदी लावण्यात आली आहे. गुजरातमध्येही कडक नियमावली आखण्यात आली आहे. त्यामुळे तेजस एक्स्प्रेसचे प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. परिणामी पुन्हा एकदा मुंबई-अहमदाबाद तेजस एक्सप्रेस बंद करण्यात आल्याची माहिती आयआरसीटीद्वारे देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CIDCO: सिडको थकबाकीदार! नवी मुंबई पालिकेकडून मालमत्ता जप्तीची प्रक्रिया सुरू

Shiroli MIDC : शिरोली एमआयडीसीत ऑईल दुकानाला भीषण आग; अग्निशमन दलाची धावपळ

Numerology : 'या' 2 मूलांकाच्या लोकांना कधीच सांगू नका तुमचे सिक्रेट; सरड्यासारखे रंग बदलून जगापुढे करतात तुमची नाचक्की

Latest Marathi News Live Update : पुण्यात बोरवेलमुळे मेट्रो बोगद्याला भगदाड, मेट्रोचे काम सुरू असलेल्या बोगद्यात पाण्याची गळती

Kolhapur City Boundary Expansion : कोल्हापूर शहराची हद्दवाढ २०२७ पर्यंत होणार नाही, खरं कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT