light 
मुंबई

'निसर्ग'मुळे गावच्या-गावं अंधारात, वीजेविना नागरिक हैराण

सकाळवृत्तसेवा

मुरुड : निसर्ग चक्रीवादळाच्या अस्मानी संकटामुळे मुरुड तालुक्यातील घरांसह बागायतदारांचे अतोनात नुकसान झाल्याने मुरुड या पर्यटन तालुक्याची 10 ते 15 वर्षे पिछेहाट झाली आहे. मुरूड तालुक्यांतील 72 गावे अंधारात असुन विज वितरण कंपनीच्या अकार्यक्षमतेमुळे दुरुस्तीचे काम धिम्या गतीने सुरू राहिल्यास नागरिकांना काळोखात रहावे लागणार आहे. 

वीज नसल्याने नागरीकांची दमछाक होत आहे. बँकाचे व्यवहार तसेच आर्थिक संस्थांचे कामकाज ठप्प असुन जनरेटर्सचा धंदा तेजीत असुन इनव्हर्टर बॅटरी चार्जीगसाठी प्रति तास 750 रुपये आकारले जात आहेत. घरघंटी व पिठाची गिरणी बंद झाल्याने तयार पिठ खरेदी करावे लागत आहे. 
विज नसल्याने खडी मशिन बंदचा फटका बांधकाम व्यावसायिकांना परिणामी या व्यवसायातील लोकांचे रोजगार ठप्प आहेत.लोकप्रतिनिधींनी दौरे केले तथापि वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडुन विज पुरवठा करण्याबाबत कोणतेही आश्वासन देण्यात आले नाही. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात नुकसानग्रस्तांना मदतीचा हात मिळेल व विजेची समस्या सुटेल असे वाटले होते; मात्र दौरा अचानक रद्य झाल्याने सर्वसामान्यांची घोर निराशा झाली आहे.

ठाणे परिमंडळाकडुन 15 कर्मचारी मदतीसाठी पाठविण्यात आले आहेत. मात्र ही कुमक अतिशय कमी आहे. लोकप्रतिनिधी वा तालुका दंडाधिकाऱ्यांकडुन सातत्याने या संदर्भात जो आढावा घेणे गरजेचे होते तो घेतल्याचे चित्र दिसत नाही. गेल्या 12 दिवसात या संदर्भात नागरिकांनी संयम राखला; मात्र अधिकाऱ्यांची दिरंगाई होत असल्याने नागरिकांचा उद्रेक झाल्यास ती जबाबदारी वितरण कंपनी घेणार आहे का, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

because of nisarg cyclone village dont get light in murud, read full story

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SIR इफेक्ट! पश्चिम बंगालमध्ये ९० लाख मतदार वगळले, निवडणूक आयोगाने यादी केली प्रसिद्ध

IPL मुळे माझं आंतरराष्ट्रीय करियर उद्ध्वस्त झालं..., केवीन पीटरसनचा खळबळजनक दावा; इंग्लंड क्रिकेटवरही आरोप

Shaktipeeth Highway Route Change : 'शक्तिपीठ' महामार्गाचा मार्ग बदलला; माण–खटावमधून जाणार, शिखर शिंगणापूर-गोंदवलेही जोडले जाणार

Latest Marathi News Live Update : अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

बॉम्बस्फोट, सायरन… तरीही ‘ठरलं तर मग’! इस्त्रायलमधील प्रेक्षकांची मालिकेबाबत दिवानगी पाहून थक्क व्हाल, Viral Video

SCROLL FOR NEXT