Pankaja Munde ajit pawar esakal
मुंबई

Pankaja Munde: "महायुतीत तिसरा भिडू आल्यामुळे पंकजा मुंडेंना फटका?"; BJP-NCP चे दोन नेते तुफान भिडले... राजकारण तापलं

सुरेश धस यांनी देखील मिटकरी यांच्या विधानावर प्रत्युत्तर दिले आहे. "पंकजा मुंडे यांचा पराभव कसा झाला हे आमचा पक्ष पाहून घेईल. आम्ही त्याबाबत आढावा पक्षाला देऊ, पंकजा मुंडे यांना सांगू, अमोल मिटकरींना त्याबद्दल बोलण्याची गरज नाही.

Sandip Kapde

बीडचे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी वादग्रस्त विधान केले आहे. "अजित पवार आमच्यासोबत आल्याने आमचं वाटोळं झालं," असे त्यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत महायुतीत तिसरा पक्ष का आला, हे लोकांना सहन झाले नाही, त्यामुळेच आम्हाला कमी जागा मिळाल्या, असेही धस यांनी स्पष्ट केले होते. धस यांच्या या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

"आमची लायकी आणि औकात काढण्याचं एवढंच काम भाजप नेत्यांकडे राहिलं आहे. सुरेश धस साहेबांनी उत्तर द्यावं, की पंकजा मुंडे यांचा पराभव कसा झाला आणि बाप्पा कसे निवडून आलेत. कुणामुळे निवडून आले हे कृपया करून आम्हाला उघड करायला लावू नका," असा इशारा मिटकरी यांनी दिला.

धस यांचे प्रत्युत्तर-

सुरेश धस यांनी देखील मिटकरी यांच्या विधानावर प्रत्युत्तर दिले आहे. "पंकजा मुंडे यांचा पराभव कसा झाला हे आमचा पक्ष पाहून घेईल. आम्ही त्याबाबत आढावा पक्षाला देऊ, पंकजा मुंडे यांना सांगू, अमोल मिटकरींना त्याबद्दल बोलण्याची गरज नाही. कुणीही चुटूर फुटुर येणार आणि आम्हाला बोलणार असं चालणार नाही," असे धस म्हणाले.

महायुतीतील तिसऱ्या पक्षामुळे फटका- महायुतीत तिसरा भिडू आल्यामुळेच मोठा फटका बसल्याचे सुरेश धस यांनी स्पष्ट केले. "शिवसेना-भाजपा ही नैसर्गिक युती आहे, परंतु या युतीत तिसरा भिडू आल्याने लोकांमध्ये नाराजीचे भावना होत्या," असे त्यांनी सांगितले.

धस यांच्या मते, लोकांनी या तिसऱ्या पक्षाच्या एंट्रीला स्वीकारले नाही, ज्यामुळे भाजपाला निवडणुकीत नुकसान झाले. राजकीय वातावरण तापले- सुरेश धस आणि अमोल मिटकरी यांच्या वादामुळे राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे.

भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील हा वाद आगामी निवडणुकांवर कोणता प्रभाव टाकेल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. सध्या महायुतीतील तिसऱ्या पक्षाच्या भूमिकेबद्दल चर्चा जोरात आहे आणि हे प्रकरण राजकीय वर्तुळात चांगलेच गाजत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT