मुंबईः कोरोना संसर्गाच्या भीतीचा फटका चिल्ड बियरच्या विक्रीवर होत असल्याचे चित्र आहे. कोरोना संसर्गाच्या भीतीने मद्यप्रेमींनी चिल्ड बियरची चव घेण्याचा नाद सोडल्याचे दिसून येत आहे. मुंबई उपनगरात गेल्या वर्षी एप्रिल ते सप्टेंबर महिन्यात 269.89 बल्क लिटर बियरची विक्री झाली होती. त्या तुलनेत या काळात केवळ 91.32 बल्क लिटर बियरचीच विक्री झाली आहे. त्यामुळे बियर विक्रीवर तब्बल 66.16 टक्के थंडावल्याचे राज्य उत्पादन विभागाच्या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.
कोरोना संसर्गाच्या भीतीने अनेकांनी मद्य सेवन टाळणे सुरू केले आहे. सर्दी, खोकला, घशात खवखवणे असा त्रास होत असणे ही कोरोनाची प्राथमिक लक्षणे समजल्या जाते. त्यामुळे या काळात गरम पाणी पिण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ञांनी दिला आहे. याचा एकत्रित परिणाम चिल्ड बियरच्या विक्रीत झाल्याचे जाणकारांनी म्हटले आहे.
अधिक वाचा- अन्वय नाईक यांना सरकारकडून न्याय: सचिन सावंत
कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे अनेक तळीरामांनी चिल्ड बियरला रामराम केलाय. त्यामुळे मुंबई उपनगरात बियर विक्री तब्बल 60 टक्याने थंडावली आहे. राज्यात बियर विक्रीत 50 टक्के घट झाली आहे. त्यामुळे लॉकडाऊनमुळे आधीच आर्थिक संकटात आलेल्या मद्यविक्री व्यवसायिक अधिकच हतबल झाले आहे.
विभाग | 2019 | 2020 |
मुंबई उपनगर- 269.89 | 91.32 | 66.16 टक्के |
राज्य - 1614.23 | 673.97 | 58.25 टक्के |
महिने | 2019 | 2020 | एकूण टक्केवारी घट |
एप्रिल | 305.56 | 0 | 100 टक्के |
मे | 364.58 | 139.87 | 61.63 टक्के |
जून | 312.84 | 146.59 | 53.14 टक्के |
जुलै | 233.25 | 114.26 | 51.2 टक्के |
ऑगस्ट | 194.53 | 122.68 | 36.93 टक्के |
सप्टेंबर | 203.47 | 150.56 | 26 टक्के |
महिने | 2019 | 2020 | एकूण टक्केवारी घट |
एप्रिल | 48.12 | 00 | 100 टक्के |
मे | 50.99 | 11.88 | 76.70 टक्के |
जून | 51.46 | 17.72 | 65.57 टक्के |
जुलै | 41.72 | 17.60 | 57.82 टक्के |
ऑगस्ट | 38.39 | 19.67 | 48.64 टक्के |
सप्टेंबर | 39.30 | 24.45 | 37.78 टक्के |
बियर आणि विस्कीच्या विक्रीत घट झाली आहे. रेस्टारेट बार मध्ये 50 टक्के परिणाम झाला आहे. नागरिकांमध्ये कोरोनाची भिती आणि नागरिकांच्या आर्थिक परिस्थितीमूळे नागरिक रेस्टॉरंट बारमध्ये येण्यास टाळत आहे.
प्रदिप शेट्टी, रेस्टॉरंट बार मालक
---------------------------------
(संपादनः पूजा विचारे)
Beer sales in Mumbai cooled by 66.16 per cent on fears of corona
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.