eknath shinde_DahiHandi 
मुंबई

Eknath Shinde : "दीड महिन्यांपूर्वी आम्ही 50 थरांची हंडी फोडली"; CM नं जागवल्या आठवणी

ठाण्यातील टेंभीनाका दहिहंडी उत्सावत मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली, यावेळी ते बोलत होते.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्यात आज दहिहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. ठाण्यातील टेंभीनाका येथील दहिहंडी उत्सावात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी राज्यातील राजकीय भुकंपाच्या आठवणी जाग्या केल्या.

मुख्यमंत्री म्हणाले, या दहीहंडी उत्सवाला येताना मला विशेष आनंद होतो की दिघे साहेबांचं स्वप्न होतं की एक दिवस ठाण्याचा मुख्यमंत्री झाला पाहिजे आणि आता ते प्रत्यक्षात आलं आहे. काय त्या माणसाची दूरदृष्टी असेल काय त्यांचे विचार असतील. मला आनंद होतोय की या दहीहंडी उत्सावला मला उपस्थत राहता आलं यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो. आम्ही दीड महिन्यापूर्वी सर्वात मोठी राजकीय हंडी फोडली. बाळासाहेबांच्या आणि दिघे साहेबांच्या आशीर्वादानं आम्ही ही हंडी फोडली. यामध्ये आम्ही पन्नास थर लावले.

उत्सवांवरील मर्यादा वैगरे बस झालं

हे सरकार सर्वसामान्यांचं सरकार आहे. या सरकारमधून सर्वांना न्याय देण्याचं काम केरणार आहे. त्यामुळं सर्वांना सांगू इच्छितो की जल्लोषात आणि काळजी घेऊन उत्सव साजरे करा. कोराना अजून संपलेला नाही. त्यामुळं संशय आला, किंवा लक्षणं वाटली तर आपली तपासणी करुन घ्या. कोविड, स्वाईन फ्लू आणि डेंग्यू याचा देखील फैलाव होतोय त्यामुळं काळजी घेणं गरजेचं आहे. मर्यादा वैगेरे बस झाले दोन अडीच वर्षे आपण हे पाळलं. त्यामुळं आपण गणेशोत्सावातील नियम-अटी शिथील केल्या, सर्व परवानग्यांचे पैसे माफ केले. राज्यात सर्वांच्या जीवनात चांगलं जीवन आणण्याचा प्रयत्न हे सरकार करणार आहे.

हे सरकार शेतकऱ्यांचं, कष्टकरऱ्यांचं, गोविंदांचही

मुख्यमंत्री म्हणाले, सरकार हे तुमच्या सर्वांचं आहे, शेतकऱ्याचं, कष्टकऱ्याचं, कामगारांच आणि गोविंदाच देखील. गोविंदाच्या या सणाला आपण सार्वजनिक सुटी देऊन टाकली आहे. तसेच दुसरीकडे गोविंदांना दुर्देवानं काही झालं तर १० लाखांचं विमाकवचही घोषीत केलं आहे. तसेच प्रो कबड्डी प्रमाणं आता प्रो गोविंदा पुढच्या वर्षापासून सुरु होईल. तसेच क्रीडामध्ये ५ टक्के आरक्षणही लागू होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut Raj Thackeray meeting : संजय राऊत, राज ठाकरेंच्या भेटीला; महापालिका निवडणुकीनंतर ठाकरे बंधूंमध्ये दुरावा?

MS Dhoni ला बसला स्पीडचा फटका, अतिघाईमुळे द्यावा लागणार 'इतक्या' रुपयांचा दंड; काय आहे प्रकरण ?

Latest Marathi News Live Update : यवतमाळच्या नेर तालुक्यात बिबट्या विहरीत पडला

Mumbai-Goa Highway Accident : होळीच्या सणावर विरजण! 18 वर्षाच्या बहिणीचा भावासमोरच दुर्दैवी अंत; खारेपाटणमधील शेट्ये कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

Junk Food Cancer Myth: जंक फूड सोडलं म्हणजे कॅन्सरचा धोका संपला? डॉक्टरांनी सांगितले धक्कादायक सत्य, काळजी घ्या

SCROLL FOR NEXT