मुंबई

आपल्या पाठिशी मुंबा देवीची कृपा आणि विठू माऊलीचे आशिर्वाद आहेत; वादळाच्या तडाख्यातून मुंबई वाचल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या भावना

सकाळ वृत्तसेवा

मुंबई- बुधवारी निसर्ग चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवर धडकलं. कोकण किनारपट्टीहून हे चक्रीवादळ मुंबईत येऊन धडकणार होतं. मात्र मुंबईत पोहोचण्याआधी वादळानं दिशा बदलली आणि त्याचा वेगही मंदावला. त्यामुळे मुंबईवरील मोठं संकट टळलं. दरम्यान कोकण किनारपट्टीवर वादळ धडकल्यानं रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाण्यासह अनेक ठिकाणी याचा फटका बसला. या चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी मुंबईसह पोलिस, महापालिका प्रशासन, एनडीआरएफ, अग्निशमन दल आणि अन्य सर्व आपत्कालीन यंत्रणा सज्ज होती. त्यामुळे मोठी हानी टळली. याच दरम्यान या संकटाच्या काळात मुंबईसह राज्याचं रक्षण करणाऱ्या सर्वांचेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आभार मानलेत. 

निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यातून मुंबईसह महाराष्ट्राचे रक्षण करणाऱ्या सगळ्यांचेच मुख्यमंत्र्यांनी आभार मानलेत. मुंबईवर मुंबा देवीची कृपा आहे, तसेच पंढरपूरच्या विठू माऊलीचे आशीर्वाद आहेत,' अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे. 

मुख्यमंत्र्यांनी एका निवेदनाद्वारे सर्वांचे आभार मानले आहेत. पुढे मुख्यमंत्री म्हणाले की, मुख्य म्हणजे या वादळाचा सामना करणारे महापालिका अधिकारी, जिल्हा प्रशासन, आपत्कालीन व्यवस्थापन, वैद्यकीय पथके या सगळ्यांचे कौतुक करावे तेवढं थोडंच. वृत्तवाहिन्या सुद्धा लोकांना चांगली माहिती देत होत्या. निसर्गापुढे कोणाचंही काही चालत नाही. पण संकटकाळात महाराष्ट्र एक आहे. खंबीर आहे हे या वादळात दिसून आले. हीच आपली एकजूट महाराष्ट्राला सर्व संकटातून बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही.

वादळाचे हे संकट मोठे होते. पण आपण सगळ्यांनी परतवून लावले आहे. जनता आणि प्रशासनाने झुंज दिली आणि संकटाची तीव्रता कमी केली. दुर्दैवाने दोन जीव अपघातात गेले. कोकणात आणि इतरत्र नुकसानही झालं आहे. या नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश दिले असल्याचं मुख्यमंत्र्यांनी निवेदनात म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Video: फडणवीसांच्या नात्यातील महिला जरांगेंकडे! धनंजय मुंडेंनी त्रास दिल्याचा आरोप

ऑस्ट्रेलियाचा गेम झाला, शेवटच्या सामन्याआधीच T20 World Cup मधून बाहेर; Super-8 मधील ७ संघ ठरले, आता एका जागेसाठी कोण शर्यतीत?

Latest Marathi News Live Update : भाईंदरात १९ वर्षीय तरुणीवर बलात्कार, मनसेचा आक्रमक पवित्र्याने आरोपीला अटक

पडद्यावर रोमॅंटिक हिरो पण खऱ्या आयुष्यात पत्नीला अशी वागणूक द्यायचा मिथुन चक्रवर्ती; इतक्या सुंदर बायकोला त्याने...

Yeola News : येवल्यात घरकुलांचा निधी पडून! ५ हजार लाभार्थ्यांनी अजून पायाही खोदला नाही; प्रशासनाकडून नोटिसा

SCROLL FOR NEXT