best bus 
मुंबई

अरे वाह!! लॉकडाऊनमध्येही 'बेस्ट' सुसाट; बेस्टचे रोजचे उत्पन्न तब्बल 'इतक्या' लाखांवर..

सकाळ वृत्तसेवा, सकाळवृत्तसेवा

मुंबई : लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर बेस्टच्या प्रवाशांची संख्या वाढू लागली असून उत्पन्नही वाढत आहे. आता बेस्टला दररोज 84 लाखापर्यंत उत्पन्न मिळत असल्याची माहिती बेस्टने दिली. 

सध्या बेस्टच्या ताफ्यातील 2926 बस रस्त्यावर धावत आहेत. प्रवाशांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या आठवड्यात सात लाख असलेली प्रवाशी संख्या आता काल 8 लाख 58 हजार 888 पर्यंत पोचली आहे. त्यापोटी सुमारे 84 लाख रुपये इतके उत्पन्न मिळाले असल्याची माहिती बेस्टने दिली. 

 रेल्वे फक्त अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱयांसाठी सुरू आहे मात्र बेस्ट सर्वांसाठी सुरू असल्याने रेल्वेचे प्रवाशी बेस्टने प्रवास करीत आहेत. कोरोना अजूनही नियंत्रणात नाही. 

कोरोनाचा अजूनही नियंत्रणात नाही. बसमधून चढण्या उतरण्याची प्रवाशाना शिस्त नाही. कोरोनाचा धोका समोर दिसत असूनही नागरिक बससाठी तुडुंब गर्दी करीत आहेत. सोशल डिस्टनसिंग पाळले नाही तर बेस्टची लाल परी धोक्याची ठरू शकते.

बेस्टच्या रस्त्यावर धावणाऱ्या बस : 2926
प्रवासी संख्या : 8,98,888
कालचे उत्पन्न : 93, 96, 648

best bus daily collection is now 84 lac read full story 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Supply: स्वयंपाकाच्या गॅसवर केंद्राचा मोठा निर्णय! २१ कंपन्यांसाठी LPG उत्पादनाचा कोटा निश्चित; केंद्राची नवी रणनीती

Marathi News Live Updates : दिल्लीत २५ 'अटल कॅन्टीन्स'चे उद्घाटन; ५ रुपयांत मिळणार जेवण

Amit Shah: सोनिया गांधींच्या 'त्या' कृतीवर अमित शाह संतापले! चित्तोडगडमधून साधला निशाणा; म्हणाले, देशाची माफी मागा...

Dharur Ghat Accidents: धारूर घाटात अपघातांची मालिका कायम; जिल्हाधिकाऱ्यांच्या दुरुस्ती आदेशाला विलंब, नागरिकांमध्ये संताप

Malshej Ghat Project Protest: माळशेज घाट भोरांडे जलविद्युत प्रकल्प रद्द करण्यासाठी मढ येथे आदिवासींचा ‘गाढव मोर्चा’ व रास्ता रोको; अदानी हटाओ, सह्याद्री बचावोच्या घोषणा

SCROLL FOR NEXT