मुंबई

बेस्टचं विलीन मुंबई महापालिकेत होणार? पाठपुरावा करण्याचे राज्य सरकारला निर्देश

समीर सुर्वे

मुंबई: बेस्ट उपक्रम महानगर पालिकेने विलीन करण्याबाबत राज्य सरकारकडे पाठपुरावा करा असे निर्देश बुधवारी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रशासनाला दिले. बेस्टच्या 2021-22 या वर्षाच्या अर्थसंकल्पावर बोलताना त्यांनी या सुचना बेस्ट प्रशासनाला केल्या.

महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर बेस्टचा अर्थसंकल्प महानगर पालिकेत विलीन करण्याची घोषणा शिवसेनेने केली होती. त्यानुसार महापालिकेच्या सभागृहात ठराव मंजूर करुन राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. मात्र,अद्याप राज्य सरकारकडून अद्याप निर्णय झालेला नाही. बेस्टच्या अर्थसंकल्पावर बोलताना अध्यक्ष यशवंत जाधव यांनी हा मुद्दा उपस्थित केला. बेस्टला अनुदान दिल्यानंतरही परिस्थितीत बदल होत नाही. त्यामुळे आता बेस्ट उपक्रम महापालिकेत विलीन करण्याबाबत पाठपुरावा करावा असे जाधव यांनी सुचवले. महापालिकेने आतापर्यंत बेस्टला 2 हजार 500 कोटी रुपयांचे अनुदान दिले आहे. तरीही बेस्ट आजही 2 हजार कोटी रुपयांच्या तोट्यात आहे.

बेस्ट समितीने 1 हजार 887 कोटी रुपये तुटीचा अर्थसंकल्प मंजूर करुन तो स्थायी समितीच्या पटलावर मांडला आहे. त्यावर बुधवारी जाधव बोलत होते. बेस्टकडून उत्पन्नाचे नियोजन योग्य पध्दतीने होत नसल्या बद्दलही जाधव यांनी नाराजी व्यक्त करत कर्जाच्या व्याजा पोटी वर्षाला 500 ते 600 कोटी रुपये खर्च केले जात आहे. पालिकेकडून मिळणाऱ्या अनुदानाचाही योग्य वापर केला जात नाही असेही त्यांनी नमूद केले.
 

सलग चौथ्यावेळी तुटीचा अर्थसंकल्प

नियमानुसार बेस्टला तुटीचा अर्थसंकल्प सादर करता येत नाही. मात्र,गेल्या वर्षी बेस्टने महापालिकेकडे तुटीचा अर्थसंकल्प सादर केला होता. हा अर्थसंकल्प पालिकेने बेस्टकडे परत पाठवला होता. त्यापूर्वी दोन वेळा तुटीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. त्यानंतर आता सलग चौथ्या वेळेस तुटीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे.

---------------------------

(संपादन- पूजा विचारे)

BEST Chance merge with bombay Municipal Corporation state government follow up

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब चालकांनो लक्ष द्या! ओला-उबर चालवायची असेल तर आधी ५ दिवसांचे प्रशिक्षण अनिवार्य; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

IND vs ZIM: "जे प्रॅक्टिसमध्ये करतो, तेच मॅचमध्येही..." वैभव सूर्यवंशी 'प्लेअर ऑफ द सीरिज' पुरस्कार जिंकल्यावर काय म्हणाला?

Police Station Fire : भायखळा पोलिस ठाण्यात अचानक आग; ऐतिहासिक इमारतीच्या पहिल्या मजल्याला आग

10 Point Action Plan for Women Safety : महिला सुरक्षेसाठी जिल्हास्तरावर 10 कलमी राष्ट्रीय कृती आराखडा; NCW चा महत्त्वाचा निर्णय

Rahul Gandhi: 'विद्यार्थ्यांवर पॅलेट गन चालवण्याचा आदेश कोणी दिला?' राहुल गांधींचा अमित शहांना थेट सवाल; पत्र लिहून मागितले उत्तर

SCROLL FOR NEXT