best place to visit in mumbai for night life 
मुंबई

झगमगत्या मुंबईची नाईट लाईफ! एकदा तरी जरुर भेट द्या 'या' ठिकाणांना

शर्वरी जोशी

मायानगरी म्हणून कायम मुंबईकडे पाहिलं जातं.  मुंबई कधीच थांबत नाही किंवा शांतही होत नाही. त्यामुळे या धावत्या शहराचं साऱ्यांनाच आकर्षण आहे. अनेक जणांना मुंबईविषयी प्रचंड उत्सुकता आहे. यात येथील नाईट लाईफ कशी असते किंवा ती अनुभवण्याची अनेकांची इच्छा असते. त्यामुळेच मुंबईत जर का रात्रीच्या वेळी फिरायचं असेल किंवा मुंबईची नाईट लाईफ कशी असते हे अनुभवयाचं असेल तर अशी काही ठिकाणं आहेत जेथे प्रत्येकाने नक्कीच भेट दिली पाहिजे. यात प्रामुख्याने मरीन लाइन्स, चौपाटी, सी फेस असे अनेक पर्याय पर्यटकांसमोर उपलब्ध आहेत. मात्र, याच्या व्यतिरिक्त नाईट लाईफ एन्जॉय करता येतील अशी कोणती ठिकाणं आहेत ते पाहुयात.

१. मरीन लाइन्स -
अनेकांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू असलेलं ठिकाण म्हणजे मरीन लाइन्स. सकाळ असो वा संध्याकाळ हे ठिकाण कायम गजबजलेलं असतं. समुद्राजवळ शांतपणे बसून आपल्याच विचारात मग्न व्हायचं असेल तर हे ठिकाण सर्वोत्तम आहे.  सकाळप्रमाणेच या ठिकाणची संध्याकाळ तर अत्यंत नयनरम्य असते. मावळता सूर्य, मंद वारा आणि शांतता हे या ठिकाणचं खास वैशिष्ट्य आहे. संध्याकाळ झाली की येथे माणसांची वर्दळ कमी होते. परंतु, वाहनांची गर्दी आणि गगनचुंबी इमारतींमधील प्रकाश अनेकांचं लक्ष वेधून घेतात.

२. वरळी सी फेस -
जर स्वत: ला वेळ द्यायचा असेल तर वरळी सी फेसला संध्याकाळच्या वेळी नक्कीच भेट दिली पाहिजे. वरळी सी फेस हे खासकरुन तरुणाईमध्ये लोकप्रिय आहे. येथे कायम सळसळत्या तरुणाईचा उत्साह पाहायला मिळतो. त्यामुळे जर मित्रपरिवारासोबत रात्री फिरण्याचा बेत असेल तर योग्य ती काळजी घेऊन या ठिकाणाला नक्की भेट द्या.

३. गेट वे ऑफ इंडिया -
गेट वे ऑफ इंडियाचं रात्रीचं सौंदर्य हे अत्यंत विलोभनीय आहे. दिवसभर समुद्रात काम करुन नाविक त्यांच्या घराकडे गेले असतात आणि सगळ्या बोटी एका रांगेत किनाऱ्यावर उभा असतात. गेट वे ऑफ इंडियाच्या टोकावर उभं राहिल्यानंतर अथांग समुद्रावर एक नजर टाका. आयुष्यातील अनेक घटना झरझर करत डोळ्यासमोर उभ्या राहतील. इतकंच नाही तर, भविष्यातदेखील अशी अनेक स्वप्न पूर्ण करायची आहेत याची जाणीवदेखील या ठिकाणी गेल्यावर जाणवते.

४. जुहू चौपाटी -
दिवसा गजबज असलेला जुहू चौपाटीचा किनारा रात्री पूर्णपणे शांत होतो. त्यामुळे निरव शांततेचा अनुभव घ्यायचा असेल तर इथे नक्की भेट द्या. या ठिकाणी मित्र परिवार किंवा कुटुंबासोबत नक्कीच एक फेरफटका मारता येईल. तसंच रात्रीच्या वेळी येथे अनेक खाद्यपदार्थाचे स्टॉल सुरु असतात. त्यामुळे खवैय्यांसाठी ही एक पर्वणीच आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Tariff : डोनाल्ड ट्रम्प यांचा जपान अन् दक्षिण कोरियाला मोठा धक्का! ; २५ टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा

Modi Government and Farmers : शेतकऱ्यांसाठी GOOD NEWS! ; कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली मोठी माहिती, 'आता लवकरच...'

Pachod News : शिक्षकांना चक्क विद्यार्थ्यांच्या गणवेषाचीही हवीय टक्केवारी; शिक्षकाने केली पुरवठादाराकडे टक्केवारीची मागणी

Nationwide strike : मोठी बातमी! देशभरात तब्बल २५ कोटी कर्मचारी संपावर जाणार; सर्वसामान्यांना कोणत्या कामांमध्ये फटका बसणार?

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

SCROLL FOR NEXT