लॉकडाऊनमध्येही मुंबईला चालतं-फिरतं ठेवणारे कोरोनाच्या विळख्यात!  
मुंबई

लॉकडाऊनमध्येही मुंबईला चालतं-फिरतं ठेवणारे कोरोनाच्या विळख्यात!

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : बेस्टच्या कामगारांमध्ये कोरोनाचा झपाट्याने प्रादुर्भाव होत असल्याने कामगारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बेस्टच्या 10 हजार 972 कामगारांची कोरोना तपासणी झाली असून त्यातील 600 कामगारांना क्वांरंटाईन केल्याची माहिती बेस्टच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. दिड हजाराहून अधिक कामगारांना घरी राहण्याचा सल्लाही देण्यात आला असून कोरोनामुळे मृत पावलेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांची संख्या 6 झाली आहे.

मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्यानंतर शहरात संपूर्ण लॉकडाउन करण्यात आले; मात्र आरोग्य, सुरक्षा, आपत्कालीन अशा अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी बेस्टची सेवाही सुरू ठेवण्यात आली; मात्र आता बेस्ट कर्मचाऱ्यांमध्येही कोरोनाचा फैलाव होत असल्याचे चित्र आहे. बेस्टच्या 10 हजार 972 कामगारांची कोरोना तपासणी झाली असता त्यात 600 कामगारांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली. या कर्मचाऱ्यांना क्वांरंटाईन केल्याची माहिती माहिती बेस्टच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. उपाययोजनेचा भाग म्हणून दीड हजाराहून अधिक कामगारांना घरी राहण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. उपाय योजनेचा भाग म्हणून गाड्यांची नियमित धुलाई आणि निर्जंतुकीकरण केले जात असल्याची माहिती बेस्टने दिली.

60 टक्के कामगार मुंबईबाहेरील
बेस्टचे बहुतांश कामगार झोपडपट्टया आणि चाळीमध्ये राहतात. सध्या सर्वच झोपडपट्ट्यांमध्ये कोरोनाचा फैलाव झाला आहे. त्यामुळे बेस्टच्या अनेक कामगारांना कोरोनाची बाधा होत आहे. बेस्ट उपक्रमातील 60 टक्के कामगार, कर्मचारी मुंबई हद्दीच्या बाहेर राहतात. त्यांना कामावर पोहोचण्यासाठी गाड्या उपलब्ध नाहीत. काही कर्मचाऱ्यांच्या इमारती, वस्त्या आणि वसाहती सील झाल्याने ते अडकून पडले आहेत. 

  • तपासणी झालेले कामगार : 10972
  • क्वांरंटाईन केलेले कामगार : 600
  • कामगारांचा मृत्यू : 6
  • रुग्णालयात उपचार घेत असलेले कामगार : 60

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought: दुष्काळग्रस्त तालुक्यांची संख्या वाढणार, लोकप्रतिनिधींकडून आणखी तालुक्यांचा समावेशाच्या मागणीची शक्यता

Vaijapur Student Assault Case: गणिताचे कोडे न सुटल्याने चौथीच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण

Shiv Sena Leader Death : शिंदेसेनेच्या बड्या नेत्याने उचललं टोकाचं पाऊल, शेती पिकत नसल्याने घेतला निर्णय

Latest Marathi News Live Update : मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा

ST Bus: एसटी प्रवासात NCMC कार्ड अनिवार्य; फक्त ३ दिवस बाकी, आताच करा 'हे' काम, अन्यथा सवलत रद्द

SCROLL FOR NEXT