ठाणे शहरात पोलिसांतर्फे ठिकठिकाणी लावण्यात आलेले जनजागृती फलक 
मुंबई

सावधान... केवायसीमुळे व्हाल कंगाल 

दीपक शेलार

ठाणे : अत्याधुनिक तंत्रज्ञान व्यवहारात वरदान ठरत असले, तरी नेटबॅंकिंगसाठी हे तंत्रज्ञान अभिशाप ठरत आहे. नेट बॅंकिंगचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू झाल्यापासून सायबर गुन्ह्यामध्ये कमालीची वाढ झाली. या वाढत्या गुन्ह्यांना आळा घालताना नागरिकांनी सतर्क राहावे यासाठी ठाणे पोलिसांनी शहरात फलकबाजी करून जनजागृती सुरू केली आहे.

गेल्या काही दिवसांत पेटीएमच्या खात्याचे केवायसी करण्याच्या नावाखाली अनेकांना कंगाल व्हावे लागले आहे. त्यामुळे या टोळक्‍यांचे कंबरडे मोडण्यासाठी ठाणे पोलिसांची सायबर गुन्हे शाखा कामाला लागली असून पेटीएम केवायसीसंदर्भात येणाऱ्या लघुसंदेशांना (एसएमएस) प्रतिसाद देऊ नका, असे आवाहन करणारे फलक ठिकठिकाणी झळकावले जात आहेत. 

खासगी कंपनीत व्यवस्थापकीय संचालक (मॅनेजिंग डायरेक्‍टर) असलेल्या ठाण्यातील एका बड्या अधिकाऱ्याच्या मोबाईलवर 23 डिसेंबरला पेटीएम अद्ययावत करण्याबाबत संदेश आला. भामट्यांनी त्यांना एका ऍपमध्ये स्वतःची माहिती अद्ययावत करण्यास सुचवून "क्‍यूएस' नावाचे ऍप डाऊनलोड करण्यास भाग पाडले. त्यानंतर दोन दिवसांत त्यांच्या दोन बॅंक खात्यांतून 13 लाख रुपये लंपास केले.

या वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ठाणे पोलिसांनी जनजागृती सुरू केली आहे. पेटीएमच्या खात्याचे केवायसी "अपडेट' करण्यासाठी खात्याची माहिती कोणी मागत असेल, तर सावध राहा. अनोळखी व्यक्तीला आपल्या बॅंक खात्याची माहिती देऊ नका. तसेच त्या व्यक्तीशी कोणताही आर्थिक व्यवहार करू नका. खास करून ज्येष्ठ नागरिकांनी याबाबत काळजी घ्यावी. अशा पद्धतीने कोणी तुम्हाला संपर्क साधात असेल तर त्याची माहिती सायबर सेलला द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. 

ठाण्यातील सत्यजित शाह यांना 20 डिसेंबर 2019 रोजी दुपारी एक एसएमएस आला. 

  • " Dear Paytm customer Your Paytm has been today hold KYC Aadhar pan card submit please contact Paytm office Ph : 8927889281' त्यानुसार शाह यांनी वरील क्रमांकावर संपर्क साधला असता भामट्याने त्यांना ऍपच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला;
  • मात्र शाह यांनी याबाबत अज्ञानी असल्याचे भासवताच भामट्यांनी https://play.google.com/store/apps/details?id=com.teamviewer.quicksupport.market अशी लिंक पाठवली. या लिंकमधील teamviewer या शब्दाने शाह सतर्क झाले; अन्यथा या लिंकमुळे त्यांचा सर्व डेटा भामटे घेऊ शकले असते. शाह यांनी याबाबत सायबर शाखेकडे तक्रार नोंदवली. 

सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी व त्यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने ट्विटरवर @CyberDost या नावाने हॅंडल सुरू केले आहे. याद्वारे सायबर गुन्ह्यांबद्दलची माहिती तसेच यासंबंधी घ्यावयाची काळजी याबद्दल नियमित माहिती देण्यात देण्यात येते. नागरिकांनी बॅंकेचा युजर आयडी, एटीएम/डेबिट कार्डचा क्रमांक व पिन, पासवर्ड, ओटीपी कोणाही व्यक्तीला देऊ नये. तसेच संशयास्पद संदेशांना अथवा प्रलोभनांना बळी पडू नये. 
- संजय जाधव, पोलिस उपायुक्त, 
सायबर सेल, ठाणे गुन्हे शाखा. 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Group: शेअर बाजार उघडताच TCSचे शेअर्स कोसळले; गुंतवणूक करावी की नाही, तज्ज्ञ काय म्हणतात?

Homemade Glow Mask: 'या' 4 प्रकारे चेहऱ्यावर मुलतानी माती लावा अन् 15 मिनिटांत चेहऱ्यावर येईल अद्भुत चमक

"मी महाराष्ट्राची मुलगी" मराठी भाषा विवादावर शिल्पाने बोलणं टाळलं; "मला या वादावर.."

'हार मानणार नाही, पुन्हा नव्याने सुरुवात करु' कॅनडातील कॅफेवरील गोळीबानंतर कपिल शर्माची प्रतिक्रिया

Pune Accident: दुर्दैवी घटना! 'उंडवडी सुपे येथील अपघातात दाेनजण जागीच ठार'; कार व दुचाकीचा भीषण अपघात

SCROLL FOR NEXT