मुंबई

मोठी बातमी - भांडुप ते विक्रोळी मेट्रो रेल्वेने जोडणार? MMRDA ने मागवल्या निविदा

संजय घारपुरे

मुंबई ः भांजुप विक्रोळी या प्रवासासाठी लवकरच मेट्रोचा पर्यायही उपलब्ध होणार आहे. या दोन स्थानकांसह उपनगरी रेल्वेवरील चार स्थानके मेट्रोला जोडली जाणार आहेत.  महानगर प्रवेश विकास महामंडळाने भांडुप, विक्रोळीसह मानखुर्दी आणि कांजुरमार्गला मेट्रो रेल्वेने जोडण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. यापूर्वी मेट्रो चार मार्गास भांडुप, विक्रोळी आणि कांजुरमार्ग ही स्थानके जोडण्यात येणार आहे, तर मेट्रो दोन बीवर मानखुर्द स्थानकात जाता येणार आहे.

मेट्रो आणि उपनगरी रेल्वे जोडण्याच्या योजनेअंतर्गत मेट्रो चारवरील भांडुप स्थानक आणि मध्य रेल्वेवरील भांडुप स्थानक जोडण्यात येईल. याचबरोबर याच मार्गावरील गांधी नगर ते कांजुरमार्ग आणि विक्रोळी ते विक्रोळी स्थानक हे जोडण्यात येईल. मेट्रो दोन बी मार्गावऱील मानखुर्द स्थानकातून हार्बर मार्गावरील मानखुर्द स्थानकात जाता येणार आहे. 
उपनगरी रेल्वेतील वाढती गर्दी तसेच सतत वाढणाऱ्या वाहनामुळे वाहतूक कोंडीतून मेट्रोमुळेकाही प्रमाणात सुटका होईल अशी अपेक्षा आहे. आता उपनगरी रेल्वे स्थानक आणि मेट्रो स्थानके जोडल्यास रस्त्यावरील गर्दी कमी होऊ शकेल हा विचार करण्यात आला आहे. आता यासंदर्भातील संपूर्ण आराखडा तयार करण्यासाठी महानगर विकास महामंडळाने निविदा मागवल्या आहेत. त्यासाठी 29 जुलैपर्यंत मुदत दिली आहे. 
मेट्रो कॉरिडॉर तसेच त्यांना जोडण्यात येणाऱ्या स्थानकांची यादी एमएमआरडीएच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. सादर करण्यात आलेल्या निविदाचे विश्लेषण करुन 31 जुलैस टेंडर दिले जाण्याचेही ठरले आहे. 

मुंबई महानगर क्षेत्रात एकंदर 13 मेट्रेो एकंदर तीनशे किलोमीटर अंतर धावतील. मेट्रोतून प्रवास करणाऱ्यांसाठी उपनगरी रेल्वे किंवा मोनो रेल्वे तसेच मेट्रोचा पर्यायही पुढील प्रवासासाठी देण्यात येणार आहे. त्यासाठीच अनेक स्थानके एकमेकाला जोडण्याची तयारी सुरु झाली आहे.

----------------------------------------

संपादन - तुषार सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मामेभावाशी बळजबरीनं लग्न लावून दिलं, पुन्हा पुन्हा अत्याचार; हाजी मस्तानच्या मुलीची न्यायासाठी मोदी-शहांकडे विनवणी

Eknath Shinde: पंतप्रधानांवर टीका करणे म्हणजे ‘सूर्यावर थुंकण्यासारखे’, एकनाथ शिंदेंचं वक्तव्य; नेमकं काय म्हणाले?

Maharashtra Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result 2025 Live: नागपूरमध्ये भाजपचं वर्चस्व! २७ पैकी २२ जागा जिंकल्या, काँग्रेसला केवळ एका जागेवर विजय

Maratha Agitation:'पाटणला कुणबी प्रमाणपत्रांसाठी अधिकाऱ्यांची उदासिनता'; सकल मराठा समाजाचा आंदोलनाचा इशारा..

Jalgaon News : थंडीचा 'रौद्र' अवतार! जळगावात हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद; आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन

SCROLL FOR NEXT