मुंबई

भारत बंदचा फटका, घाऊक बाजारात कांद्याचा भाव पुन्हा वाढला

भाग्यश्री भुवड

मुंबई: केंद्राच्या कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी मंगळवारी भारत बंदची हाक देण्यात आली होती. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यातही कडकडीत बंद पुकारण्यात आल्याचं पाहायला मिळाले. अनेक बाजार समित्या आणि व्यवसाय, वाहतूक ठप्प असल्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारत बंदचा फटका आता कांद्यालाही बसला आहे. यामुळे, वाशीच्या एपीएमसी या घाऊक मार्केटमध्ये पुन्हा एकदा चढ्या दराने कांदा विकला गेला. 

शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदमध्ये एपीएमसी मार्केट सहभागी झाले होते. नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात कडकडीत बंद ठेवण्यात आले होते. एपीएमसी मधील पाचही बाजारपेठा पूर्ण बंद ठेवण्यात आल्या होत्या.

आधी एकाच वेळेस कांद्याच्या 150 गाड्यांची आवक झाली होती. लॉकडाऊननंतर पहिलीच सर्वात मोठी ही आवक ठरली. दोन दिवसांपूर्वी 20 ते 22 रुपये किलोने विकले जाणारे कांदे आता तेच बुधवारी 25 रुपये किलोने विकले केले गेले. भारत बंदीचा फटका याला बसला असून पण एकदाच आवक झाल्याने आता गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांनी माल बाजारात आणला नव्हता. याचा ही फटका दरवाढीला बसला आहे. 

बुधवारी एपएमसी मार्केटमध्ये 70 गाड्यांची आवक झाली. हा कांदा 25 रुपये किलोने घाऊक बाजारात विकला गेला. नाशिक, पुणे आणि अहमदनगर येथून किमान 75 गाड्यांची आवक झाली होती. बुधवारी संपूर्ण देशामध्ये आवक घटली असून गुरुवारपर्यंत अजून कांद्याचे आणखी किती भाव वाढेल हे स्पष्ट होईल. दोन दिवसांत आवक वाढली तर बाजारात कांद्याच्या भावाला तेजी येणार नाही असे एपीएमसी कांदा- बटाटा अडद व्यापारी संघटना अध्यक्ष राजेंद्र शेळके यांनी सांगितले आहे.

भाज्यांचे दरही वाढले

मंगळवारी पुकारलेल्या बंदमुळे भाज्यांचे दर 10 टक्क्यांनी वाढले आहेत. भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी मुंबई, नवी मुंबईसह राज्यातील महत्त्वाच्या अनेक बाजार समित्या बंद होत्या. यामुळे बुधवारी भाज्यांचेही दर कडाडले होते. मात्र, ते ही खाली उतरतील अशी माहिती एपीएमसी घाऊक भाजीपाला व्यापारी महासंघ अध्यक्ष कैलाश ताजणे यांनी दिली आहे.

-----------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Bharat Bandh effect Onion prices hike vashi apmc

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trapit Bansal: भारतीय तरुणाचा जगभरात डंका! IITian त्रपित बंसलला Meta कडून अब्जावधींची ऑफर; सॅलरी ऐकून व्हाल थक्क

Pune News : पुणे बाजार समितीच्या दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Latest Maharashtra News Updates : मध्य वैतरणा धरणाचे तीन दरवाजे उघडले, लगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Pune court verdict : पत्नीशी दोनदा घटस्फोट, तिसऱ्यांदा लग्नाचं वचन देत केला बलात्कार? ; पुणे कोर्टाने पतीला सोडलं निर्दोष, कारण...

Viral Video: महिला पोलिसाचं धाडस! महाकाय १६ फूट लांब किंग कोब्रा पकडला, पाहा थरारक व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT