Bharat Jodo shivaji park  sakal
मुंबई

Bharat Jodo: राहुल गांधींच्या स्वागतासाठी मुंबई सज्ज; होणार जोरदार शक्तीप्रदर्शन

Rahul Gandhi: निवडणुकीची आचारसंहिता उद्या संध्याकाळी लागण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर राहूल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा मुंबईत दाखल होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

Bharat Jodo:  काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा शनिवारी (ता.१६) मुंबईत दाखल होत असून या यात्रेच्या स्वागतासाठी मुंबई सज्ज झाली आहे.

महाविकास आघाडीतील घटक पक्ष या यात्रेच्या निमित्ताने जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे. यात्रेच्या स्वागतासाठी मुंबईत सर्वत्र होर्डिंग लावण्यात आले आहेत.

‘सबको समान अवसर मिलने तक, न्याय का अवसर मिलने तक’, अशा आशयाचे पोस्टर, बॅनर्स, होर्डिंग काँग्रेसने रस्त्यांवर ठिकठिकाणी लावले आहेत. निवडणुकीची आचारसंहिता उद्या संध्याकाळी लागण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर राहूल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा मुंबईत दाखल होत आहे.

शनिवारी दुपारी १ वाजता यात्रा भांडूप सोनापूर येथे दाखल होणार असून तेथे राहुल गांधी यांचे स्वागत करण्यात येणार आहेत. सोनापूर सिग्नलपासून ही यात्रा पुढे धारावी मार्गे माटुंगा पश्चिम येथे संध्याकाळी ४ वाजता येईल. माटुंगा येथील झेड ब्रिजजवळ सामाजिक नेते तुषार गांधी आणि सामाजिक संघटनांच्यावतीने या यात्रेचे स्वागत होणार आहे.

संध्याकाळी ५ वाजता ही न्याय यात्रा चैत्यभूमीवर पोहोचणार असून राहल गांधी हे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला अभिवादन करतील. त्यानंतर शिवाजी पार्कवर जाहिर सभा होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyanagar Politics: ट्रम्पमुळे कोपरगाव रस्ता रखडला: सुजय विखे पाटील; अजब दाव्याने राजकीय चर्चा

IND vs SL 1st Test: रिषभ पंतला संघातून हाकलण्याची वेळ आलीय! फॅन्सची मागणी; माजी क्रिकेटपटूने त्याचा 'common sense' काढला...

Mumbai Goa Highway Toll : ओसरगाव टोलनाका आजपासून सुरू; मासिक 350 रुपयांचा पास की 50 टक्के सूट? जाणून घ्या वाहननिहाय टोलचे संपूर्ण दर

Marathi News Live Updates : कांदिवलीत चार मजली व्यावसायिक इमारतीला आग; ११ जणांची सुखरूप सुटका

West Bengal Hotel Fire : साखरझोपेत असतानाच मृत्यूने गाठले ! पहाटे हॉटेलला भीषण आग; ७ जणांचा होरपळून मृत्यू, अनेक जखमी

SCROLL FOR NEXT