Bhatsa Dam: धरणाचे पाचही दरवाजे उघडले; गावांना सतर्कतेचा इशारा; पावसाचा जोर कायम sakal
मुंबई

Bhatsa Dam: धरणाचे पाचही दरवाजे उघडले, गावांना सतर्कतेचा इशारा; पावसाचा जोर कायम

Latest Maharashtra Rain Update: 1फूट अंतर बाकी असून तालुक्यातील नदी,नाले दुथडी भरून वाहत असल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Kahrdi Latest Update: भातसा धरणाच्या जलग्रहण क्षेत्रात सतत पाऊस पडत असल्यामुळे, धरणात येणारा संभाव्य पाणीसाठा वाढत आहे.

त्यामुळे भातसा धरणाची पाणी पातळी, जलाशय परिचलन सूचीनुसार नियमित करणेकरिता, भातसा धरणाचे पाचही वक्रद्वारे 4 ऑगस्ट मध्यरात्री 12.30 व वाजता 1.25 मी. ने उघडण्यात आले असून त्यामधून 19537.84 क्यूसेस ने पाणी सोडण्यात आले आहे.

त्यामुळे भातसा नदीच्या तिरावरील शहापूर - मुरबाड रस्त्यावरील सापगाव पुल, तसेच सापगाव नदीकाठावरील इतर गावांना सतर्क राहण्याच्या सूचना पाटबंधारे विभागाच्या भातसा धरणाचे अभियंता रविंद्र पवार यांनी दिले आहेत.

शहापुर-मुरबाड रोड पूल कोणत्याही क्षणी पाण्याखाली येण्याची शक्यता असून पाणी व पुलाचा रस्ता यात फक्त 1फूट अंतर बाकी असून तालुक्यातील नदी,नाले दुथडी भरून वाहत असल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे.

3 ऑगस्ट रात्री 10 वाजता भातसा धरणाची पाणी पातळी 138.60मी, एकूण पाणी साठा 882.882 दलघमी व धरणातील साठयाची टक्केवारी 90.44 टक्केहोती तेव्हा धरणाचा चौथा दरवाजा उघडण्यात आला होता.

भातसा धरणाच्या जलग्रहण क्षेत्रात सतत पाऊस पडत असल्यामुळे, धरणात येणारा संभाव्य येवा वाढत आहे. त्यामुळे भातसा धरणाची पाणी पातळी, जलाशय परिचलन सूचीनुसार नियमित करणेकरिता, भातसा नदीच्या तिरावरील विशेषतः शहापूर - मुरबाड रस्त्यावरील सापगाव पुल, तसेच सापगाव नदीकाठावरील व भातसा

धरणाखालील साजिवली,सरलांबे,कासगांव,तुते,कवडास, सापगांव,बामणे,खुटघर,अंदाड यासारख्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून संबंधित गावांच्या सरपंच, तलाठी, ग्रामसेवक यांनाही सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्याअसल्याचे नायब तहसीलदार वसंत चौधरी यांनी सांगितले.

भातसा,तानसा व मोडक सागर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्याने व सर्वच धरणाच्या वाहत्या प्रवाहाजवळगटारी अमावस्या साजरी करायला पर्यटक मोठ्या प्रमाणात धरणालगतच्या पाण्यात येत असल्याने शहापुर पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amazon child shopping: आता बोला...! आई-वडील झोपेतच अन् तिकडं त्यांच्या लाडक्या चिमुकल्यानं चक्क 'अमेझॉन'वर केली अडीच लाखांची खरेदी

Mahadev Munde Case: खळबळजनक! '‘महादेव मुंडे खून प्रकरणातील प्रत्यक्षदर्शीला वाल्मीकने संपवलं’', आकस्मिक मृत्यूचा बनाव

MLA Ramesh Thorat : माजी आमदार रमेश थोरात घड्याळ हाती बांधण्याच्या तयारीत; अशोक पवार मात्र पक्षातच समाधानी

Latest Marathi News Updates: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

MLA Rahul Kul : उजनी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये बुडीत बंधारे उभारावेत; आमदार कुल यांची अधिवेशनात मागणी

SCROLL FOR NEXT