मुंबई

भिवंडीत खळबळ, बेपत्ता 7 वर्षीय मुलाचा सांगाडा आढळला पाण्याच्या टाकीत

शरद भसाळे

मुंबई: भिवंडीत दिड महिन्यांपासून बेपत्ता झालेल्या एका सात वर्षीय मुलाचा मृतदेह एका इमारतीच्या पाण्याच्या टाकीत आढळून आला आहे. भिवंडीतल्या भोईवाडा भागातल्या समरुबाग कंपाऊंडच्या इमारतीच्या पाण्याच्या टाकीत मृतदेह आढळला. 
ही घटना शनिवारी संध्याकाळी उशिरा उघड झाली. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 

सदर ठिकाणी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवून दिले आहे. याबाबत पोलिसांनी नोंद घेऊन तपास सुरू केला आहे.

आहत ( वय 7 वर्ष ) असे मृत मुलाचे नाव असून तो 25 नोव्हेंबरला बेपत्ता झाला होता. या प्रकरणी भोईवाडा पोलिस ठाण्यात मुलगा हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यामुळे पोलिसांनी शोध सुरू केला होता.

दरम्यान या परिसरात संध्याकाळी उशिरा परिसरातील काही मुले या ठिकाणी क्रिकेट खेळत होती. त्यावेळी क्रिकेट खेळताना मुलांचा बॉल पाण्याच्या टाकीत पडला आणि त्यानंतर ही घटना उघड झाली आहे. पोलिसांच्या उपस्थितीत नागरिकांनी मृतदेहाचा सांगाडा बाहेर काढला असून पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे. 

मृतदेह शवविच्छेदनासाठी स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी भोईवाडा पोलिस पुढील तपास पोलिस निरीक्षक शंकर इंदलकर करीत आहेत. सात वर्षीय मुलाच्या मृतदेहाचा सांगाडा आढळून आल्याने परिसरात खळबळ माजली आहे.

-------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Bhiwandi 7 year old missing boy died and found water tank

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SMAT 2025 : सूर्यकुमार यादवच्या विकेटने मॅच फिरली, सर्फराज खानचे अर्धशतक व्यर्थ; संजू सॅमसनच्या संघाचा मुंबईवर विजय

Matoba Maharaj Temple Theft : नैताळे येथील मतोबा महाराज मंदिरात धाडसी चोरी; तब्बल तीन किलो चांदीच्या दोन मूर्ती व दानपेटी घेऊन चोरटे पसार

Latest Marathi News Live Update : विद्यार्थ्यांना जादू टोण्यासारखा प्रकार करून तलब जिहादमध्ये अडकवण्याचा प्रयत्न

Education News: मुख्याध्यापकपद रिक्त; विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान दोन शाळांचे कामकाज शिक्षकांच्या भरवशावर

Land Partition Measurement : मोठा दिलासा! जमिनीच्या पोटहिश्शांची मोजणी आता फक्त २०० रुपयांत; राज्य शासनाचा नवा निर्णय

SCROLL FOR NEXT