building collapsed in Bhiwandi Esakal
मुंबई

Bhiwandi Building Collapsed: भिवंडी इमारत दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याची घोषणा केली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : भिवंडी इथं आज दुपारी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले. (Bhiwandi Building Collapsed 5 lakhs each to families of death persons in incident)

जखमींना शासकीय खर्चाने वैद्यकीय उपचार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. पोलीस, अग्निशमन दल, एनडीआरएफ तसेच इतर बचाव पथकांनी हे बचाव कार्य व्यवस्थित पार पाडावं तसेच जखमींना तत्काळ रुग्णालयांमध्ये हलवून उपचार सुरू करावेत, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत.

दरम्यान, दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकले आहेत. भिवंडीत वलपाडा परिसरातील ही इमारत असून घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. इमारतीच्या खालच्या भगत गोदाम होते यामध्ये 20 ते 30 जण काम करत होते. तर वरती रहिवासी होते. यादुर्घटनेत आत्तापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shilpa Shetty Ganeshotsav: शिल्पा शेट्टीच्या घरी यंदा गणेशोत्सव नाही; 22 वर्षांची परंपरा खंडीत होणार!

MLA Rohit Pawar : शिरसाटांचा तत्काळ राजीनामा घ्या; बेकायदा जमीन वितरणप्रकरणी रोहित पवार यांची मागणी

Khadakwasla Dam : खडकवासला धरणातून रात्री दहा वाजता ८५१७ क्युसेकचा विसर्ग सुरु

Mumbai News : राज्यातील महामंडळे दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर; आठशे कोटींची कर्जे थकीत, गैरव्यवहाराचा संशय

MP Supriya Sule : सत्ताधाऱ्यांकडून पक्ष, घर फोडल्यानंतर आता प्रभाग फोडण्याचे राजकारण सुरू

SCROLL FOR NEXT