crime news esakal
मुंबई

Crime News : भात न शिजवल्याने पतीला राग अनावर; पत्नीच्या डोक्यात दांडका घालून केली हत्या

मंगळवारी आरोपीने पत्नीवर लाकडी दांडक्याने हल्ला करत तिचा खून केला. निजामपुरा पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Crime News : ठाणे जिल्ह्यात पतीने पत्नीला बेदम मारहाण करत पत्नीची हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. यावेळी बायकोने नवऱ्यासाठी भात शिजवला नाही. म्हणून पतीने पत्नीला मरेपर्यंत मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे खोणी गावातुन एका चाळीतून आरोपीला अटक केली आहे. आरोपी २३ वर्षीय रद्दी व्यापारी आहे. त्याचे नाव शंकर वाघमारे असे आहे. वर्षभरापूर्वी 20 वर्षीय ज्योत्स्नाशी शंकरने लग्न केले होते. हे दाम्पत्य भिवंडीत राहत होते.

मंगळवारी आरोपीने पत्नीवर लाकडी दांडक्याने हल्ला करत तिचा खून केला. निजामपुरा पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणातील तपास अधिकारी पोलीस निरीक्षक अतुल लांबे यांनी सांगितले की, आरोपी मंगळवारी घरी गेला आणि भात न शिजवल्याने पत्नीशी वाद घालू लागला. दोघांमध्येभांडण झाले यावेळी पत्नीचा मृत्यू होईपर्यंत त्याने लाकडी दांडक्याने मारहाण केली

शेजाऱ्यांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला पण तोपर्यंत उशीर झाला होता आणि ज्योत्स्ना यांचा रक्तबंबाळ होऊन मृत्यू झाला होता. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT