Kapil-Patil 
मुंबई

कपिल पाटील यांना मंत्री बनवून ठाणे जिल्ह्यात शिवसेनेला शह देण्याची खेळी?

नवी मुंबई विमानतळ नामांतर वादाचा फायदा उचलण्याचा प्रयत्न.

दीनानाथ परब

मुंबई: महाराष्ट्रातून नारायण राणे, हिना गावित यांच्यापाठोपाठ कपिल पाटील यांचे नाव सुद्धा मंत्रिपदासाठी चर्चेत आहे. मोदी सरकारच्या आज होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात कपिल पाटील (Kapil patil) यांची सुद्धा वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. कपिल पाटील पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते. (ncp) पण २०१४ लोकसभा निवडणुकीच्याआधी त्यांनी भाजपात (bjp) प्रवेश केला. २०१४ मध्ये भाजपाच्या तिकिटावर मोदी लाटेत ते सर्वप्रथम भिवंडीतून खासदार (Bhiwandi Mp) झाले. त्यानंतर २०१९ मध्येही त्यांनी सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला. (Bhiwandi Mp Kapil patil in race of ministry possibly if affect on growth of shivsena)

कपिल पाटील यांचे नाव मंत्रिपदासाठी चर्चेत असल्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटत असेल. पण त्यामागे भाजपाची स्थानिक समीकरण आहेत. आगामी महापालिका निवडणूक आणि पक्षविस्तार हे दोन उद्देश भाजपासमोर आहेत. लोकसंख्येच्या दृष्टीने ठाणे एक मोठा जिल्हा आहे. सात तालुके आणि सहा महानगरपालिका ठाण्यामध्ये आहेत. ठाणे जिल्ह्यावर सध्या शिवसेनेचे बऱ्यापैकी वर्चस्व आहे. या वर्चस्वाला भाजपाला शह द्यायचा आहे. त्या दृष्टीने कपिल पाटील हे सध्याच्या घडीचा भाजपाकडे असलेला आश्वासक चेहरा आहे.

ठाणे जिल्ह्यावर शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांची पकड आहे. त्यांना मानणारा मोठा वर्ग या जिल्ह्यामध्ये आहे. शिंदेंची पकड कमी करुन, भाजपाचा विस्तार हे लक्ष्य कपिल पाटील यांच्यासमोर आहे. कपिल पाटील सध्या पक्षविस्तारासाठी मेहनत घेतच आहेत. पण मंत्रीपद मिळाल्यास त्यांना आणखी बळ मिळू शकते.

नवी मुंबई विमानतळाला शेकापचे दिवंगत नेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यावरून आगरी समाज आक्रमक झालेला आहे. कपिल पाटील यांना मंत्री करण्यामागे आगरी मतांचे ध्रुवीकरण करण्याचा हेतू असू शकतो. आगरी समाज शिवसेनेवर नाराज आहे. नवी मुंबई विमानतळ नामकरणाच्या वादात रायगड जिल्ह्यात पडद्यामागून भाजपाचे नेते आघाडीवर आहेत. आता ठाण्यातही तशाच पद्धतीने कपिल पाटील यांच्या रुपाने नेतृत्व उभं करण्याचा भाजपाचा प्रयत्न असू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 2nd T20I : वैभव सूर्यवंशी IN... पण, ना संजू OUT, ना अभिषेक..! भारताच्या Playing XI मध्ये दोन खेळाडूंचे पदार्पण होणार

Mobile Restart : मोबाईल कधी रिस्टार्ट करावा अन् कधी नाही? आत्ताच घ्या जाणून नाहीतर फोन होऊ शकतो खराब

एकाच दिवशी ३ दिग्गज क्रिकेटपटूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली; रिटायरमेंट सामन्यात अश्रू अनावर, पाहा व्हिडिओ

Thane Crime: क्लासला जातो सांगून ५ जण घराबाहेर पडले, लखनौला पोहोचल्याचे समजल्या नंतर...; मुंब्य्रात नेमकं काय घडलं?

Pune Accident: राजगड सहलीवर काळाचा घाला! पाबे घाटात ट्रॅव्हल बस ४० फूट दरीत; दोन ठार, 19 जण जखमी..

SCROLL FOR NEXT