मुंबई

भिवंडी: टोरेंट कार्यालयात तोडफोड करणारे मनसेचे 7 कार्यकर्ते अटकेत

शरद भसाळे

मुंबईः  वीजबील माफीसाठी भिवंडी शहरातील टोरेंट पावर ग्राहक सेवा केंद्र कार्यालयाची मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली होती. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत पोलिसांनी ७ मनसे कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे.

वीजबील माफीसाठी भिवंडी शहरातील अंजूरफाटा ओसवाल वाडी आणि आमपाडा चाविंद्रा रोड येथील टोरेंट पावर ग्राहक सेवा केंद्र कार्यालयात मनसेच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी तोडफोड केली होती. या तोडफोडीविरोधात नारपोली आणि शांतीनगर पोलिस ठाण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर टोरंट पावर कंपनीच्यावतीने तक्रार देत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे नारपोली पोलिसांनी कारवाई करत सहा तर  शांतीनगर पोलिसांनी एक अशा एकूण 7 मनसे कार्यकर्त्यांना आज अटक केली आहे.

अरुण गव्हाणे, लखन पाटील, वैजनाथ पवार, समाधान गव्हाणे, ओमकार लवांडे, सचिन कांबळे नारपोली तर दत्ता रमेश टोले यास शांतीनगर पोलिसांनी अटक केली आहे. 

भिवंडी शहर परिसरात वीज पुरवठा आणि वीज बिलाची वसूली करणाऱ्या टोंरेट पावर कंपनीने लॉकडाऊन काळामध्ये नागरिकांना जादा दराने वीज बील आली आहेत. अशी तक्रार करून विज बिलात माफी द्यावी अशा घोषणा मनसेकडून देण्यात आल्या होत्या.  

7 जानेवारीला दुपारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी  शहरातील अंजूर फाटा ओसवाल वाडी आणि आमपाडा चाविंद्रा रोड येथील टोरेंट पॉवर कंपनीच्या ग्राहक सेवा केंद्र कार्यालयाच्या दरवाजाची काच आणि पार्टिशन फोडून लाखो रुपयांचे नुकसान केले होते. त्यामुळे नारपोली आणि शांतीनगर पोलिस ठाण्यात मनसे अध्यक्षासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

-------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Bhiwandi Seven MNS workers arrested for vandalizing torrent office

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vehicle Green Tax: महाराष्ट्रात वाहनधारकांना मोठा धक्का! वाहनांवर ग्रीन टॅक्स वाढणार; नवीन कर रचना किती? जाणून घ्या...

Akola Unseasonal Rain : अकोल्यात अवकाळी पावसासह गारपीट; पिकांना फटका

Nanded News : अर्धापूरात गारपीट व वादळी वाऱ्याचा तडाखा; केळी, टरबूज, गहू, आंबा पिकांचे मोठे नुकसान

Dhananjay Munde: धनंजय मुंडेंचा रोख कुणाकडे? ''राज्यातील बड्या नेत्यांचं मला संपवायचं कारस्थान...''

IPL 2026 Marathi News: वैभव सूर्यवंशीला आयपीएल सुरू होण्यापूर्वी कॅप्टन रियान परागचा सल्ला; म्हणाला, त्यांच्यापासून दूर राहा...

SCROLL FOR NEXT