Kishori Pednekar Esakal
मुंबई

Kishori Pednekar: किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात मुंबई महापालिकेकडून मोठी कारवाई

मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अडचणींमध्ये वाढ

सकाळ डिजिटल टीम

शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत झालेल्या फसवणूक आणि बनावट कागदपत्रांच्या प्रकरणात चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर आता किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात मुंबई महापालिकेकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे.

किशोरी पेडणेकर यांचे वरळीमधील गोमाता नगरमधील कार्यालय आणि घर सील करण्यात आले आहे. किशोरी पेडणेकरांसाठी हा खूप मोठा धक्का आहे. मुंबई महानगरपालिकेने किशोरी पेडणेकर यांचे एसआरए कायद्यानुसार घर आणि कार्यालय सील केले आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी किशोरी पेडणेकर यांच्यावर एसआरए योजनेवरुन गंभीर आरोप केले होते. या योजनेवरून त्यांची चौकशीही करण्यात आली होती. तर किशोरी पेडणेकर यांनी एसआरए योजनेतर्गत बांधलेल्या सदनिका बळकावल्याचा आरोपही भाजप नेते किरीट सोमाय्या यांनी केला होता. त्यानंतर आता मुंबई महापालिकेने किशोरी पेडणेकर यांच्या वरळीतील संबंधित वादग्रस्त सदनिका सील केल्या आहेत. यासंदर्भात किरीट सोमय्या यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर ट्विट करत माहिती दिली आहे.

महापालिकेने कारवाई केल्यानंतर किशोरी पेडणेकर यांनी देखील ट्विट करत भूमिका मांडली आहे. ट्विटमद्धे त्या लिहतात की, #भाडेतत्त्वावर राहत होते, माझे कुठचेही गाळे नव्हते व कोणतेही गाळे माझे सील झालेले नाही हे माहिती असून सुद्धा श्री.किरीट सोमय्या यांनी गरीब नागरिकांवर जोर दाखवून सत्तेचा वापर करून अन्याय केलेला आहे गोमातातील जनता हे ओळखून आहे. त्या गरीब नागरिकांची न्यायालयीन लढाई अजून बाकी आहे असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT