ST Employee Strike google
मुंबई

एसटी कर्मचाऱ्यांचा संप बेकायदा! मुंबई कामगार न्यायालयाचा निकाल

संपकरी एसटी कर्मचाऱ्यांच्या अडचणीत वाढ

प्रशांत कांबळे

मुंबई : एसटी महामंडळ प्रशासनानं कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप बेकायदेशीर (ST Strike Illegal) आहे, यासाठी राज्यभरातील कामगार न्यायालयात जवळपास दीड महिन्यांपासून वेगवेगळ्या ठिकाणी तक्रार अर्ज दाखल केले आहेत. औद्योगिक विवाद कायद्यानुसार लोकोपयोगी सेवा असल्यास सहा आठवडे अगोदर संपाची नोटीस (notice of intimation) देणं बंधनकारक आहे. परंतु एसटी महामंडळातील सध्या सुरू असलेल्या संपात कोणतीही कायदेशीर नोटीस देण्यात आलेली नसल्याने अखेर मुंबई कामगार न्यायालयाने (labor court) संप बेकायदा असल्याचं घोषित केलं आहे. (Big decision ST strike illegal Mumbai Labor Court verdict)

एसटी महामंडळानं कामगार न्यायालयात एमआरटीयू अँड पीयूएलपी 1971 कायद्यातील 25 कलमानव्ये संपूर्ण न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर वांद्रे येथील मुंबई कामगार न्यायालयानं सोमवारी हा संप बेकायदा असल्याचा अंतिम आदेश दिला आहे. यामुळं आता एसटी प्रशासनानं आतापर्यंत केलेल्या सर्व कारवायांना कायदेशीर संरक्षण मिळणार असून त्यामुळं एसटी कर्मचाऱ्यांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

भविष्यात एका दिवसाला आठ दिवस याप्रमाणं संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना दंड ठोठावला जाऊ शकतो. शिवाय संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना आर्थिक दंड ठोठावण्याची परवानगी एसटी प्रशासनाला मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyanagar gas Pipeline: अहिल्यानगरवासियांची प्रतीक्षा संपली; गॅस पाइपलाइनचा मार्ग मोकळा; तत्काळ काम सुरू करण्याचे शासनाचे आदेश!

Latest Marathi News Live Update : मेट्रो ९ उद्घाटनाआधीच श्रेयवादाचा वाद; 6 एप्रिलला सोहळा

Kashi-Ujjain Tourism: काशी ते उज्जैन थेट कनेक्शन!! महाकाल-विश्वनाथ मंदिर ट्रस्टमध्ये ऐतिहासिक करार; धार्मिक पर्यटनाला बुस्ट

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला सुंदरकांड पठण का मानलं जातं सर्वात प्रभावी? मानसिक शक्ती, आरोग्य अन् यशाचे गुपित फायदे काय?

History Of Rajapur : राजापूर पालिकेची १५० वर्षे; १८७६ मध्ये विकासाची नांदी, बंदर-घाटमाथा संपर्काचे केंद्र

SCROLL FOR NEXT