Mumbaikars Social-Media
मुंबई

शाब्बास मुंबईकरांनो! रुग्ण दुपटीचा कालावधी हजार दिवसांपार

शाब्बास मुंबईकरांनो! रुग्ण दुपटीचा कालावधी हजार दिवसांपार कोरोनाबद्दलची मुंबईची सद्यस्थिती, वाचा सविस्तर Big Relief from Mumbai People as Covid 19 Patients Doubling Rate gone beyond thousand days vjb 91

मिलिंद तांबे

मुंबई: शहरातील कोरोना स्थिती नियंत्रणात येत असून रुग्ण दुपटीचा कालावधी आता तब्बल एक हजार दिवसांच्याही पार गेला आहे. मुंबईतील सर्व 24 प्रभागांमधील दुपटीचा दर 1,324 दिवस झाला आहे. तिसऱ्या लाटेची चिंता सतावत असताना कोरोना संसर्ग आटोक्यात येत असल्याने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळताना दिसत आहे. तशातच मुंबईत दररोज 25 ते 30 हजारांपर्यंत कोरोना चाचण्या केल्या जात असून पाचशेच्या आत रुग्णसंख्या नोंद होत असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. (Big Relief from Mumbai People as Covid 19 Patients Doubling Rate gone beyond thousand days)

मुंबईत सर्वाधिक रुग्ण दुपटीचा कालावधी 'बी' प्रभाग सँडहर्स्ट रोडमध्ये 4,756 दिवस झाला आहे. तर सर्वात कमी रुग्ण दुपटीचा कालावधी 'ए' प्रभाग कुलाबा-फोर्ट 1,025 दिवस आहे. कोरोना रोखण्यासाठी पालिकेने चाचण्यांचे वाढवलेले प्रमाण, 'क्लोज कॉन्टॅक्ट'चा वेगाने शोध, निर्बंधांची कठोर अंमलबजावणी आणि प्रभावी उपाययोजनांमुळे रुग्णांवर नियंत्रण आले आहे. त्यासोबत महत्त्वाचे म्हणजे नागरिकांनीदेखील नियमांचे काटेकोर पालन केल्याने कोरोना आटोक्यात येण्यास मदत झाली आहे. पण असे असले तरी संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पालिकेने कंबर कसली असून आवश्यक यंत्रणा सज्ज ठेवली आहे.

गेल्या 15 दिवसांपासून मुंबईतील रुग्णसंख्या 300 ते 500 पर्यंत नोंद होते आहे. सोमवारी मागील पाच महिन्यात पहिल्यांदाच 299 सर्वात कमी रुग्ण आढळले. त्यामुळे रुग्ण दुपटीचा कालावधीही झपाट्याने वाढून 1324 दिवसांवर पोहचला आहे.24 दिवसांपूर्वी रुग्ण दुपटीचा कालावधी 720 दिवसांवर होता. आता जवळपास दुपटीने वाढून 1324 दिवसांवर पोहचला आहे.

mumbai corona

मुंबईतील सात वॉर्डमध्ये रुग्ण दुपटीचा कालावधी दीड हजारांपार गेला आहे. 'बी' वॉर्ड सँडहर्स्ट रोडने 4756 दिवसांसह रुग्ण दुपटीच्या कालावधीत आघाडी घेतली असून 'सी' प्रभाग मरीन लाइन्स 2758 दिवस, एफ/दक्षिण परळ 1976 दिवस, 'एन' प्रभाग घाटकोपर 1908 दिवस, पी/उत्तर मालाड 1834 दिवस, पी/दक्षिण गोरेगाव 1774 दिवस आणि 'एल' प्रभाग 1619 दिवस अशा 7 वॉर्डमध्ये रुग्ण दुपटीच्या कालावधीने दीड हजार दिवसांचा कालावधी नोंदवला आहे.

कोरोनाबद्दलची मुंबईची सद्यस्थिती, वाचा सविस्तर

  • एकूण रुग्ण - 7 लाख 34 हजार 761

  • आतापर्यंत डिस्चार्ज - 7 लाख 11 हजार 315

  • मृत्यू - 15789

  • सध्याचे सक्रिय रुग्ण - 5 हजार 267

  • बरे होणाऱ्या रुग्णांचा दर - 97 टक्के

  • कोविड वाढीचा दर - 0.05 टक्के

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russian Woman: रशियन महिला सापडली ते गोकर्णचं घनदाट जंगल... माणूस हरवला की रस्ता ही सापडणार नाही, फोटो पाहा

रशियन महिलेच्या मुलींचे वडील कोण? भारतात का आली होती? मोठे अपडेट समोर

Latest Maharashtra News Updates : पंचगंगा नदीची पाणी पातळी चोवीस तासांत सहा फूट सहा इंचांनी वाढली

Local Elections 2025 : नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप, इच्छुकांचा अभ्यास, जिल्हा परिषद गट-गण प्रारूप रचना; निवडणूक मोर्चेबांधणीला सुरुवात

Kolhapur Chappal Prada : ‘प्राडा’ची टेक्निकल टीम कोल्हापुरी पायतान बघून भारावली, कारागिरांची हस्तकला पाहून म्हणाले...

SCROLL FOR NEXT