अलिबाग ः विस्तीर्ण समुद्रकिनारे, माडाची झाडे आणि नयनरम्य परिसर असलेल्या अलिबागच्या प्रेमात पर्यटक पडतात; पण याच सौंदर्याची भुरळ देशभरातील "बाईकर्स'ना पडली आहे. त्यामुळेच तब्बल 300 जण शनिवार (ता.8) पासून येथे एकत्र येत आहेत. दोन दिवस चालणाऱ्या त्यांच्या "रायगड बाईकर्स फेस्टिव्हल'मध्ये त्यांचा थरार अलिबागकरांना पाहण्याची संधी मिळणार आहे.
गोवा येथे दरवर्षी मोठमोठे "बाईक फेस्टिव्हल' होतात. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या रायगड जिल्ह्यात असे महोत्सव का होऊ शकत नाहीत, असा प्रश्न काही उत्साहींना पडला. त्यातूनच "रायगड बाईकर्स फेस्टिव्हल' ही संकल्पना प्रत्यक्षात आली. या उपक्रमाद्वारेसुद्धा सुंदर समुद्रकिनारे लाभलेल्या पर्यटनस्थळांचीही प्रसिद्धी होणार आहे.
मुरूडचे बाईक रायडर प्रसाद चौलकर हे यासाठी पुढे आले. काहीतरी वेगळे आणि अनोखे करण्याच्या विचाराने त्यांनी "रायगड बाईकर्स फेस्टिव्हल'ची संकल्पना मांडली होती.
अलिबाग तालुक्यातील सॅंडी शोर, नागाव बीच येथे 8 आणि 9 फेब्रुवारी रोजी महोत्सव रंगणार आहे. अलिबाग समुद्रकिनारी दुपारी 2 वाजता रायगडचे पोलिस अधीक्षक अनिल पारसकर यांच्या हस्ते झेंडा दाखवून रस्ता सुरक्षा फेरीची सुरुवात होणार आहे. यामध्ये रायगड पोलिस दलामार्फत सुरक्षित वाहतुकीचा संदेश देण्यात येईल.
अलिबाग ते नागाव अशी ही मोटरसायकल फेरी असेल. त्यानंतर नागाव येथे विविध स्पर्धा; तसेच करमणुकीचे कार्यक्रम होणार आहेत. बाईक भ्रमंती करून रस्ता सुरक्षिततेविषयी जनजागृती करणाऱ्या "बाईकर्स' सन्मानित होतील.
या उपक्रमासाठी विलास बुरांडे यांनी नागाव येथील आपली जागा उपलब्ध करून दिली. अगदी पहिल्या वर्षांपासून कार्यक्रम ठिकाणी नियोजनाचे महत्त्वाचे काम कौस्तुभ पाटील करीत आहेत. त्याचबरोबर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आकाश राणे, महेंद्र पाटील, कविश नायर, आशीष पडवळ, धनंजय साकरुटकर, शार्दुल भोईर आणि इतर सहकारी अतिशय मेहनत घेत आहेत.
काही निवडक सदस्यांच्या मदतीने सुरू झालेल्या "बायकर्स ग्रुप'ची सदस्यसंख्या वाढत आहे. अलिबाग येथे होत असलेल्या महोत्सवाच्या निमित्ताने देशभरातील "बायकर्स' हजेरी लावणार आहेत.
- प्रसाद चौलकर, बाईक रायडर, मुरूड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.