Uddhav thackeray E-Sakal
मुंबई

मुंबईला प्राधान्य, पुण्याबरोबर भेदभाव, भाजपाचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप

पुण्यातील भाजपा नेत्यांचं काय म्हणण आहे?

दीनानाथ परब

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) दोन महापालिकांमध्ये भेदभाव करत असल्याचा आरोप पुणे महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने (bjp)केला आहे. पुणे महानगरपालिकेने (pmc)लस खरेदीसाठी जागतिक निविदा काढण्याची परवानगी मागितली होती. पण आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं आणि मुंबई महानगरपालिका लस खरेदीसाठी जागतिक निविद मागवतेय, असं पुणे भाजपाने म्हटलं आहे. (bjp accuses Chief minister uddhav thackeray favouring bmc & discriminating with pmc)

भाजपाने गुरुवारी महापालिका प्रशासनाला राज्य सरकारच्या परवानगीची वाट न पाहता लसींसाठी जागतिक निविदा काढण्याचे निर्देश दिले. "महापौर मुरलीधर मोहोळ, सभागृहाचे नेते गणेश बिडकर आणि पुण्यातील भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी पीएमसी आयुक्तांना राज्य सरकारच्या परवानगीची वाट न पाहता, लसीसाठी तात्काळ जागतिक निविदा काढण्याची विनंती केली" असे भाजपाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी सांगितले.

"इथे लोकांचे जीव धोक्यात आहेत. थोड्याही विलंबामुळे परिस्थिती गंभीर होईल. आम्ही पीएमसी आयुक्तांना मुख्यमंत्र्यांच्या परवानगीची वाट न पाहता, तात्काळ जागतिक निविदा काढण्यास सांगितले आहे" असे शिरोळे म्हणाले. सिद्धार्थ शिरोळे यांनी मुख्यमंत्र्यांवर पदाचा गैरवापर करत असल्याचा आरोप केला.

पुणे महानगरपालिकेने २० एप्रिललाच २५ लाख लस खरेदींची टेंडर काढण्यासाठी परवानगी मागितली होती. पण मुख्यमंत्र्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. "मुख्यमंत्री फक्त एका शहरातील लोकांचे प्राण वाचवण्यासाठी सर्व स्त्रोतांचा वापर करत असून पदाचा गैरवापर करतायत. पुणे महापालिकेला लस खरेदीसाठी २३ दिवस परवानगी दिली नाही. तथाकथित बनावट बीएमसी मॉडेलच्या पीआरसाठी हे सर्व केले, असा आरोप त्यांनी केला. सभागृहाचे नेते गणेश बिडकर यांनी सुद्धा असाच आरोप केला. राज्य सरकार कोरोनाकाळात पीएमसी आणि बीएमसीमध्ये भेदभाव करतय. मुंबई महापालिकेला प्राधान्य दिले जात आहे, असा आरोप गणेश बिडकर यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC: PAK vs SL सामन्यात थरार! ४,६, ६, ६... श्रीलंकेच्या कर्णधारानं दिलेलं पाकिस्तानला टेन्शन, पण शेवटच्या चेंडूवर यजमान पराभूत

PAK vs SL: श्रीलंकेने १४८ धावा करताच पाकिस्तानचा 'गेम ओव्हर'! T20 WC सेमीफायनल भारतातच होणार...

छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले शिल्प महाराष्ट्रात नाही, तर तमिळनाडूच्या 'या' किल्ल्यावर; मराठ्यांचा ज्वलंत इतिहास, एकदा नक्की बघा

T20 WC, PAK vs SL: साहिबजादा फरहानचे शतकासह विश्वविक्रम, पाकिस्तान २०० पार; पण श्रीलंकेत फिक्सिंगची चर्चा; जाणून घ्या कारण

Ganja Seized : बारामतीत अडीच कोटींचा 470 किलो गांजा हस्तगत...

SCROLL FOR NEXT