उल्हासनगर : महाविकास आघाडी तसेच भाजपा यांच्यात समान सदस्यसंख्या आणि स्थायी समिती सभापतीचे मत हे भाजपाचेच असल्याने उल्हासनगर पालिका परिवहन सेवा सभापती पदावर भाजपाचाच विजय होणार आणि महापौर-उपमहापौर निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढला जाणार, अशा आणाभाका हाकल्या जात होत्या.
मात्र मतदानाला अवघा एक तास राहिला असतानाच भाजपाच्या एका सदस्याने पळ काढल्याने सम-समान संख्याबळ झाल्यावर काढण्यात आलेल्या चिठ्ठीत महाविकास आघाडीतील ओमी कालानी टीमचे दिनेश लहरानी यांना कौल मिळाल्याने ते विजयी झाले. या निवडणुकीत भाजपाचे शंकर दावानी यांचा पराभव झाल्याने भाजपाला मोठा झटका बसला आहे.
मागील महिन्यात शिवसेना-टीओके-राष्ट्रवादी-रिपब्लिकन पक्ष-कॉंग्रेस-पीआरपी हे एकवटल्याने अवघ्या अडीच वर्षात भाजपा-साईपक्षावर सत्ताउतार होण्याची नामुष्की ओढावली होती. परिवहन समिती सभापतीच्या निवडणुकीत भाजपाकडे 6 आणि टीओके-शिवसेना-रिपब्लिकन पक्ष यांचेही 6 सदस्य आहेत. त्यात निर्णायक असणारे स्थायी समिती सभापती राजेश वधारिया हे भाजपाचेच असल्याने भाजपाला त्यांचा विजय डोळ्यासमोर दिसत होता.
परिवहन सभापतीसाठी भाजपाच्या वतीने शंकर दावानी आणि शिवसेना-राष्ट्रवादी-रिपब्लिकन पक्ष यांच्या सोबत महाविकास आघाडीत असलेले टीम ओमी कालानीच्या वतीने दिनेश लहरानी यांच्यात सामना होता. मागच्या वर्षी शंकर दावानी हे राष्ट्रवादीकडून परिवहन सदस्य झाले होते. त्यांनी भाजपात प्रवेश केल्याने पक्षाने त्यांना सभापतीच्या रिंगणात उतरवले.
दरम्यान, महापौर लिलाबाई आशान, शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, ओमी कालानी, उपशहरप्रमुख अरुण आशान, राष्ट्रवादीचे गटनेते भरत गंगोत्री, टीओकेचे सुमित चक्रवर्ती, अजित माखीजानी, संतोष पांडे, दीपक छतलानी, कमलेश निकम, पंकज त्रिलोकानी, मनीष हिंगोरानी, अशोक बजाज, सुंदर मुदलियार आदींनी नवनिर्वाचित सभापती दिनेश लहरानी यांचे अभिनंदन केले.
भाजपाच्या राजकुमारने पळ काढला
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.