मुंबई

"कोरोनासाठी पैसा नाही, दाढ्या कुरवाळण्यासाठी..."; भाजपची शिवसेनेवर टीका

विराज भागवत

मुंबई: मराठी भाषा भवन, रोहिदास भवन, डबेवाला भवन, मराठी रंगभुमी भवन यानंतर आता शिवसेनेने 'उर्दू भाषा भवन' उभारण्याची घोषणा केली आहे. भायखळा येथे उर्दू भाषा भवन उभारण्यात येणार असून त्यासाठी दीड कोटी रुपयांची तरतूदही महानगर पालिकेकडून करण्यात आली आहे. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी अर्थसंकल्पात ही तरतूद केली आहे. हे भवन फक्त मुस्लिमांसाठीच नसून उर्दू भाषेच्या अभ्यासकांसाठीही खुलं असेल. यात, उर्दू भाषेतील साहित्यदेखील उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच, उर्दू भाषेसंदर्भातील कार्यक्रमांसाठी या भवनाची जागा उपलब्ध करून दिली जाईल. या भवनासाठी दीड कोटी रूपयांची तरतूद केली आहे, अशी माहिती यशवंत जाधव यांनी दिली. या निर्णयानंतर भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर आणि ठाकरे सरकारवर टीका केली.

गेल्या काही दिवसात ठाकरे सरकार आणि मुंबई महानगर पालिका केंद्र सरकारवर टीका करताना दिसत आहे. कोरोनासारख्या अभूतपूर्व संकटासाठी केंद्राकडून आर्थिक सहाय्य केलं जात नसल्याची नाराजी त्यांनी वेळोवेळी बोलून दाखवली आहे. अशा परिस्थितीत शिवसेनेकडून मुंबईतील भायखळा परिसरात उर्दू भाषा भवनची उभारणी केली जाणार असून त्यासाठी दीड कोटीं रूपयांची तरतूद करण्यात आली आहे, या मुद्द्यावरून भाजपने शिवसेनेवर निशाणा साधला. "आगामी महापालिका निवडणुकीत  अल्पसंख्यांकांची मते मिळवण्यासाठी  महापालिकेच्या तिजोरीतून दीड कोटी खर्च करून उर्दूभवन बांधण्याचा घाट 'जनाबसेने'ने घातला आहे. कोरोना संकटाशी लढण्यासाठी पैसा नाही, त्यासाठी केंद्राकडे तगादा लावायचा आणि दाढ्या कुरवाळण्यासाठी जनतेच्या पैशाची उधळपट्टी करायची", अशा शब्दात भातखळकर यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला.

दरम्यान, उर्दू भाषा भवन नक्की कसं असावं? या भवनामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश केला जाऊ शकतो? त्यात काय काय असायला हवं? याबाबतीत नीट विचार करण्यासाठी तज्ज्ञांची एक समिती नियुक्त केली जावी, असा विचार पालिकेकडून केला जात आहे.

मुंबईत सध्या 15 ते 18 लाख मुस्लीम मतदार आहेत. आगामी महानगर पालिकेत ही मते शिवसेनेसाठी निर्णायक आहेत. मुंबईतील अनेक भागात गेल्या निवडणुकीत भाजपने शिवसेनेचा पारंपारिक मतदार स्वत:च्या बाजूने वळवण्यात यश मिळवलं होतं. त्यामुळे आता नव्या मतदारांची मोट बांधण्यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न सुरु झाले आहेत. त्याचाच भाग म्हणून उर्दू भाषा भवन उभारण्याची घोषणा आहे असं मानलं जात आहे. गेल्या वर्षी शिवसेनेचे दक्षिण मुंबईतील विभाग प्रमुख पांडूरंग सकपाळ यांनी अजान स्पर्धा घेण्याची घोषणा केली होती. त्यानंतरही त्यांच्यावर आणि शिवसेनेवर टीका करण्यात आली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohith Vemula: "रोहित वेमुला दलित नव्हता"; पोलिसांनी बंद केली केस; स्मृती ईराणी, दत्तात्रेय यांना क्लीनचीट

Pakistan Moon Mission: भारताचे 'चांद्रयान' कॉपी करण्यासाठी निघाला PAK, चीनच्या रॉकेटने केले प्रक्षेपित! आता होत आहे ट्रोल

MI vs KKR : गोलंदाजांच्या कामगिरीवर फलंदाजांचे पाणी! IPL 2024 प्ले-ऑफच्या शर्यतीतून मुंबई इंडियन्स बाहेर

SIT Raids : अश्‍लील व्हिडिओंच्या पेन ड्राईव्हप्रकरणी रेवण्णा पिता-पुत्रांच्या घरावर छापे; प्रज्वलच्या अटकेची तयारी, दहा वर्षे कारावास?

Latest Marathi News Live Update : मुंबई, ठाणेसह कोकणात आज उष्णतेच्या लाटेचा 'हवामान'चा इशारा

SCROLL FOR NEXT