Devendra-Fadnavis-Chandrakant-Patil 
मुंबई

१५ दिवसांत आणखी २ मंत्र्यांचे राजीनामे; भाजपचा खळबळजनक दावा

विराज भागवत

मुंबई: महाराष्ट्रात सध्या सचिन वाझे प्रकरण गाजतंय. सचिन वाझे NIAच्या ताब्यात आहे. त्याने बुधवारी NIAला एक पत्र दिलं. त्यात शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांनी त्याला पालिकेच्या कंत्राटदारांकडून खंडणी वसूल करण्याचे आदेश दिल्याचे नमूद केले आहे. अनिल परब यांनी कालच संध्याकाळी पत्रकार परिषद घेत आपल्यावर केलेल आरोप फेटाळले. तसेच, भाजपचे लोक तिसऱ्या मंत्र्यांचा राजीनामा घेणार म्हणत होते म्हणूनच हे बदनामीचे षडयंत्र सुरू असल्याचा आरोप परब यांनी केला. याच मुद्द्यावर बोलताना, '१५ दिवसांत महाविकास आघाडीच्या आणखी दोन मंत्र्यांचे राजीनामे घेतले जातील', असा खळबळजनक दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. ते मुंबईत बोलत होते.

"सचिन वाझेने अनिल परब यांच्यावर आरोप केलेत. या आरोपानंतर त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तत्काळ राजीनामा द्यावा आणि चौकशीला सामोर जावं", असं चंद्रकांत पाटील म्हणाले. "राज्यातील सध्याच्या परिस्थितीवर मुख्यमंत्री मौन आहेत. ते पत्रांना उत्तर देत नाही. फोन उचलत नाहीत. अनिल परब गृहखात्यात ढवळाढवळ करतात अशी तक्रार स्वत: अनिल देशमुख यांनी शरद पवार यांच्याकडे केली असल्याचं समजतंय. सचिन वाझेने परब यांच्यावर केलेले आरोप गंभीर स्वरूपाचे आहेत. त्यामुळे मी असं म्हणू शकतो की मी वर्तवलेला अंदाज खरा ठरला. आता पुन्हा एकदा सांगतो की येत्या १५ दिवसात २ मंत्र्यांचे राजीनामे होणार आहेत", असा दावा त्यांनी केला.

अनिल परबांवर 'मोक्का' लावा!

"सुरुवातीला सचिन वाझेसाठी सभागृहाचे कामकाज या सरकारने संपूर्ण दिवसभरासाठी बंद ठेवलं. ज्या वाझेवर तुमचं एवढं प्रेम होतं, तेच आता तुम्हाला नकोशे वाटत आहेत. परब यांच्यावर झालेले आरोप गंभीर असल्याने या संघंटित गुन्हेगारीसाठी परब यांना मोक्का लावण्यात यावा. सर्वसामान्य नागरिकांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली जाते. तशीच कारवाई परबांवर करण्यात यावी", अशी मागणीही त्यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT