sanjay raut chandrakant patil 
मुंबई

चंद्रकांत पाटलांचे संजय राऊतांना ओपन चॅलेंज

कार्तिक पुजारी

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच भेट घेतली. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी शिवसेना नेसे संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला.

मुंबई- भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच भेट घेतली. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी शिवसेना नेसे संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. संजय राउत यांनी मुंबई महापालिकेत एक सेफ जागा निवडावी. त्याठिकाणी निवडणूक लढवावी आणि ती जिंकून दाखवावी. जेणेकरुन त्यांना त्यांच्या क्षमतेची जाणीव होईल, असं म्हणत त्यांनी टोला लगावला. भाजप-मनसे युतीसंदर्भात शिवसेना नेते संजय राऊत यांनी वक्तव्य केलं होतं. (Maharashtra Latest Marathi News)

संजय राऊत यांना मुंबई महापालिकेत कोणत्याही जागेवरुन जिंकता येणार नाही. त्यांना वाटत असेल की पालिकेत शिवसेनेचा प्रभाव आहे, तर त्यांनी कोणत्याही त्यांना वाटेल त्या जागेवरुन निवडणूक लढवावी. त्यांनी इच्छा असेल तर दंड थोपटावे आणि आपली क्षमता तपासून पाहावी. संजय राऊत हे अमेरिकेची निवडणूक सुद्धा लढवू शकतात. यात मला शंका नाही. पण, त्यांची तेवढी क्षमता आहे का, हे त्यांनी तपासावं, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

चंद्रकांत पाटील यांनी यावेळी भाजप-मनसे युतींच्या चर्चेवरही भाष्य केलं. युतीचा कोणताच प्रस्ताव या बैठकीत नव्हता. हे दोन पक्ष एकत्र येवून निवडणुका लढवतील असे कुठलेच विचार आता नाही. राज ठाकरे यांच्या एका भाषणाचा व्हिडिओ पाहिला. भाषण ऐकलं होतं तरी काही शंका होत्या त्या दूर करण्यासाठी आलो होतो. दोन भूमिका असतात. माणूस म्हणून त्यांना काय वाटतं हे मला जाणून घ्यायचे होतं, असं पाटील म्हणाले.

राज ठाकरेंचं म्हणणे आहे की उत्तर भारतात ८० टक्के नोकऱ्या मिळाव्या तशा त्या महाराष्ट्रात पण मिळाल्या पाहिजे. त्यांची भूमिका योग्य आहे. पण जेव्हा ते बोलतात त्यात उत्तर भारतीयांना कटुता असल्या सारखे वाटते. तुम्ही तुमची भूमिका व्यापक करावी असे मी त्यांना सांगितले आहे. या दोन वर्षात मला लोकांपर्यंत जाता आले नाही असे राज ठाकरे म्हणाले. त्यांनी मला समजवलं पण आता त्यांना या गोष्टी व्यवहारात आणावे लागतील, असंही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha UCC : अमित शहांची मोठी घोषणा ! २०२९ पूर्वी २१ राज्यांत समान नागरी कायदा लागू करणार; घुसखोरांना देशातून हाकलणार

आगमन मिरवणुकीत पुन्हा अपघात! ट्रॉली उलटल्याने गणेशमूर्ती कोसळली; अंगावर शहारा येणारा Video Viral

BRICS Summit 2026 : एकाच शक्तीचं कायम वर्चस्व शक्य नाही’; BRICS मध्ये जिनपिंग यांची अमेरिकेवर टीका, पंतप्रधान मोदींचे मानले आभार

Marathi News Live Updates : आखाती देशांना इराणसोबत करार करायचा असेल, तर त्यांनी तो करावा- डोनाल्ड ट्रम्प

Ganeshotsav Security : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोहोळ व शेटफळमध्ये पोलिसांचे पथसंचलन; गुन्हेगारांचे धाबे दणाणले

SCROLL FOR NEXT