मुंबई

Ramdas Kadam: भाजप पदाधिकाऱ्यांनी जाळला रामदास कदमांचा पुतळा; महायुतीतीला वाद शमेना

Latest Crime News| जोडे मारून त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करून भाजपा पदाधिकार्यांनी आपला रोष व्यक्त केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Palghar: ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती मध्ये वादाची ठिणगी पडली आहे. शिवसेना नेते रामदास कदम यांनी पालघर आणि कोकण विभागाचे भाजप नेते तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या विषयी बेताल वक्तव्य केल्याने पालघर जिल्ह्यातील भाजप चे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

मोखाडा तालुक्यात भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रामदास कदमांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला आहे. तसेच त्यांच्या फोटो ला जोडे मारून निषेध व्यक्त केला आहे. 

 सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या विषयी  शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदमांनी बेताल वक्तव्य केले होते.  त्याचे पडसाद मोखाड्यात ऊमटले आहे. रामदास कदमांचा भाजपा मोखाडा तालुक्याचे अध्यक्ष.संतोष चोथे यांच्या नेतृत्त्वात मोखाडा चौफुली येथे जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले.

या वेळी रामदास कदम यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. तसेच त्यांच्या फोटो ला जोडे मारून त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करून भाजपा पदाधिकार्यांनी आपला रोष व्यक्त केला आहे.

  यावेळी मोखाडा तालुका अध्यक्ष संतोष चोथे, भाजपा जिल्हा सचिव विठ्ठल पाटील, भाजपा भटक्या विमुक्त आघाडी प्रदेश उपाध्यक्ष दीपक पाटील, दिलीप गाटे, उमेश येलमामे, नामदेव पाटील, अलका बुधर, प्रतीक पाघारे, दिशांत पाटील, जनार्दन गभाले, शुभम डींगोर, मिलिंद काळे, नरेंद्र चौधरी, किशोर भवारी, भूषण फाळके, हर्षल बात्रे, राजू माळी, हरी जाधव, जयपाल पाटील, धर्मा लाहारे, भास्कर चौधरी, नितेश गोंदके व इतर कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

ढिंग टांग : वाजत गाजत या...!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT