मुंबई

"पूनावालांची उठाठेव करण्यापूर्वी..."; भाजपचा नाना पटोलेंना टोला

"कोरोनाचं महाराष्ट्रातील संकट मती गुंग करणारं असलं तरी..."

विराज भागवत

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर कोणतीच टीका केलेली नाही. असं असतानाही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडणं हे दुर्भाग्यपूर्ण आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष पुण्याचे सेवक आहेत की पूनावालाचे असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला होता. त्यांना मी सांगू इच्छितो की चंद्रकांत पाटील हे कोथरूडचे आमदार असल्याने ते त्या मतदारसंघाचे, पुण्याचे आणि प्रदेशाध्यक्ष या नात्याने संपूर्ण महाराष्ट्राचे सेवक आहेत. त्यामुळे पूनावालांची उठाठेव करण्यापूर्वी नाना पटोले यांनी भाजपाच्या पुण्यातील सेवाकार्याची दखल घेतली असती, तर बरं झालं असतं", असा टोला भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी लगावला.

"भाजपा प्रदेशाध्यक्ष पुण्याचे सेवक आहेत की पूनावालाचे असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला होता. त्यांना मी सांगू इच्छितो की चंद्रकांत पाटील हे कोथरूडचे आमदार असल्याने ते त्या मतदारसंघाचे सेवक आहेत. कोथरूडचा समावेश असलेल्या पुण्याचे सेवक आहेत आणि प्रदेशाध्यक्ष या नात्याने ते संपूर्ण महाराष्ट्राचे सेवक आहेत. कोरोनाच्या संकटात त्यांच्या पुढाकाराने पुणे शहरात भाजपाने पहिल्या लाटेत प्रभावी सेवाकार्य केले आणि आता दुसऱ्या लाटेतही नव्या जोमाने सेवाकार्य चालू आहे. पूनावालांची उठाठेव करण्यापूर्वी नाना पटोले यांनी भाजपाच्या पुण्यातील सेवाकार्याची दखल घेतली असती तर बरे झाले असते. नानाजींनी आपल्या मतदारसंघात किती सेवाकार्य केले त्याची माहिती जाहीर केली आणखी चांगले होईल", असं उपाध्ये म्हणाले.

"भाजपा प्रदेशाध्यक्षांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केला. प्रत्यक्षात चंद्रकांत पाटील यांनी अशी कोणतीही टीका केलेली नाही. काल त्यांच्या नावे एक व्हॉट्सअप पोस्ट काही ग्रुपमध्ये फिरत होती. ती भाजपाने प्रसिद्ध केलेली अधिकृत प्रेसनोट नव्हती. पण नाना पटोले यांनी मात्र तो मजकूर प्रमाण मानून भाजपा प्रदेशाध्यक्षांवर टीका केली, असं दिसतं. नाना पटोले यांनी भ्रमातून बाहेर यावं आणि आरोप-प्रत्यारोपांचा खेळ खेळण्यापेक्षा राज्यातील सत्ताधारी पक्ष म्हणून कोरोनाकाळात जनतेकडे लक्ष द्यावं. सध्याचे कोरोनाचे महाराष्ट्रातील संकट मती गुंग करणारे असले तरी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी भ्रमात राहू नये. सत्ताधारी पक्षाचे नेतेच कल्पनेत जगत राहिले तर जनतेला मदत कोण करणार हा प्रश्न आहे?", असा खोचक सवालही त्यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह साखर कारखान्यांना मोठा दिलासा, मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय

बाबर आझमवर आली ७ वर्षांनंतर डोमेस्टिक क्रिकेट खेळण्याची वेळ; खराब फॉर्म अन् पाकिस्तानच्या लाजिरवाण्या पराभवानंतर PCBचा मोठा निर्णय

IPS भानु प्रताप कोण? UPSCच्या तयारीवेळी प्रेमविवाह, आता पत्नीने केले गंभीर आरोप; लेकीची बॅग घेऊन घरासमोर बसली

Latest Marathi News Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फडणवीस सरकारने घेतले ७ मोठे निर्णय

Maratha Reservation: ‘नणंद म्हणून माझ्या पतीची काळजी घ्या; सौमित्रा जरांगेंची अमृता फडणवीसांना साद, गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांना आरक्षण द्या’

SCROLL FOR NEXT