Uddhav-Thackeray-Ashish-Shelar 
मुंबई

'हिंदू धर्माला शिव्या दिल्याने ठाकरे सरकारमधल्या दोन मंत्र्यांना आनंद होतो'

विराज भागवत

मुंबई: एल्गार परिषदेत हिंदू धर्माविषयी वादग्रस्त वक्तव्य करणारा शरजिल उस्मानी याने बुधवारी दुपारच्या सुमारास स्वारगेट पोलीस ठाण्यात हजेरी लावली. यावेळी पोलिसांनी त्याच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने जबाब नोंदवून प्राथमिक चौकशी केली. एल्गार परिषदेत शरजिल यानं हिंदू धर्माविषयी केलेल्या वक्तव्यावरून राजकीय वादळ उठले होते. त्यानंतर प्रथमच शरजिल पोलिसांसमोर हजर झाले. पण त्याचा जबाब नोंदवून घेतल्यावर त्याला सोडण्यात आले. या मुद्द्यावरून आज भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलं. हिंदूविरोधी भाष्य करणाऱ्यांना ठाकरे सरकारमधील दोन मंत्री संरक्षण पुरवत आहेत. तसेच, हिंदू धर्माला शिव्या दिल्या की ठाकरे सरकारमधल्या त्या दोन नेत्यांना खूप आनंद होतो, असा घणाघाती आरोप आशिष शेलार यांनी केला.

"कोणीही हिंदूंविरोधी वक्तव्य केले तर त्या वक्तव्याला पाठिंबा देणे आणि त्या व्यक्तीच्या हिंदूविरोधी भूमिकेचे बळकटीकरण करणे हे ठाकरे सरकारमधील दोन मंत्र्यांचे काम आहे. हिंदू धर्माला शिव्या दिल्या की ठाकरे सरकारमध्ये बसलेल्या दोन मंत्र्यांच्या मनात उकळ्या फुटतात. हिंदूविरोधात वक्तव्य करणाऱ्याला मुंबईपासून पुण्यापर्यंत संरक्षण देऊन नेलं जातं. तेथेदेखील त्याचा जबाब नोंदवून त्याला सोडून देण्यात आलं. अशा या दोन मंत्र्यांचं दबावाचं राजकारण मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडे येत आहे का? असा संशय आता बळवतो आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्या दोन मंत्र्यांची नावं लवकर जाहीर करावीत", असंही शेलार म्हणाले.

"हिंदूविरोधी भूमिकेला पाठिंबा दर्शवणारे दोन मंत्री शिवसेनेचे, काँग्रेसचे की राष्ट्रवादीचे हे मी सांगणार नाही. याबाबतची स्पष्टता मुख्यमंत्र्यांनीच केली पाहिजे. जर मुख्यमंत्री स्वत: ही नावे जाहीर करणार नसतील तर मात्र आम्हीच योग्य वेळ आल्यावर ही नावे जाहीर करू. पण एक गोष्ट मी नक्की सांगतो की महाराष्ट्रातून पळून जाण्यासाठी शरजिलला ठाकरे सरकारमधील दोन मंत्र्यांनी मदत केली आहे. त्या मंत्र्यांबाबतचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लवकर घ्यावा", असा इशारा त्यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Open or Closed Update: अनंत चतुर्थीला महाराष्ट्रात बँका सुरू की बंद? RBI कडून मोठी अपडेट

Nandigram By-Election Symbol Controversy : निवडणूक आयोगाचा कारभार पुन्हा चव्हाट्यावर; 183 चिन्हं असताना 'लिफाफा' वरच वाद का? हायकोर्टानं कोणाला सुनावलं?

Thane Water Supply: ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! २४ तास पाणीकपात, कोणत्या भागांना फटका?

Latest Marathi News Live Update : मतचोरी करून खासदार झालेले कायदा बनवतायत : राहुल गांधी

Rare Otters in Sangli : सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी! कृष्णा नदीपात्रात पहिल्यांदाच आढळला दुर्मिळ पाणमांजरांचा कळप; 8 ते 9 पाणमांजरं दिसली एकत्र

SCROLL FOR NEXT