Atul-Bhatkhalkar-Anil-Parab 
मुंबई

"आरारा... काय वेळ आलीय, त्यांना कोणी तरी सांगा..."

विराज भागवत

मुंबई: महाराष्ट्रात गेले काही महिने अनेक खळबळजनक घटना घडत आहेत. सर्वप्रथम उद्योगपती यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली कार सापडली. नंतर कारचा मालक मनसुख हिरेन याची हत्या झाली. या प्रकरणांमध्ये वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझेला अटक झाली. त्याचदरम्यान मुंबईचे माजी आयुक्त परमबीर सिंह यांनी मावळते गृहमंत्री अनिल देशमुखांवर १०० कोटींच्या खंडणीबद्दलचा लेटरबॉम्ब टाकला. तो प्रकरण ताजं असतानाच आज सचिन वाझेने NIAला दिलेल्या पत्रात शिवसेनेचे अनिल परब यांच्यावर खंडणी मागण्याचे आरोप करण्यात आले. या आरोपांनंतर परब यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शपथेवर आपल्यावरील आरोप खोटे असल्याचं सांगितले. याच मुद्द्यावरून भाजपने परब यांची खिल्ली उडवली.

"सचिन वाझेने माझ्यावर लावलेले दोन्ही आरोप धादांत खोटे आहेत. मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. माझ्यावर खंडणीचे संस्कार नाहीत. मी बाळासाहेबांची आणि माझ्या दोन्ही मुलींची शपथ घेउन सांगतो की हे सारं खोटं आहे", असं अनिल परब म्हणाले. यावरून भाजपचे अतुल भातखळकर यांनी परबांवर खोचक टीका केली. "आरारा... काय वेळ आली आहे अनिल परब यांच्यावर... त्यांना कोणी तरी सांगा, ह्याच्या त्याच्या शपथा घेऊन न्यायालयातून सुटका होत नसते. तुम्हीही दिल्लीत जाऊन एखादा वकील गाठा", अशी खिल्ली उडवणारं ट्वीट भातखळकरांनी केलं.

सचिन वाझेचा 'लेटरबॉम्ब'

'जुलै-ऑगस्ट २०२० मध्ये अनिल परब यांनी शासकीय बंगल्यावर मला बोलावलं. डीसीपींच्या बदल्या होण्याच्या चार दिवस आधी परब यांनी बोलावलं होतं. सुरूवातीला SBUTबद्दलच्या तक्रारीची चौकशी करण्यास सांगितली आणि नंतर चौकशी रोखण्यासाठी SBUTच्या विश्वस्तांकडून ५० कोटी रुपये मागितले. हे काम करण्यास मी असमर्थता दर्शवली होती. जानेवारी २०२१ मध्येही परब यांनी मला पुन्हा शासकीय बंगल्यावर बोलवलं. बृहन्मुंबई महापालिकेच्या यादीतील काही ठेकेदारांची चौकशी करण्यास मला सांगण्यात आलं. अशा ५० ठेकेदारांकडून २ कोटी रुपये वसूल करण्यास त्यांनी मला सांगितलं होतं. अज्ञात तक्रारींच्या आधारावर या प्रकरणाची चौकशी सुरू होती. ठेकेदारांविरोधात CUIने केलेल्या तपासातून काहीच निष्पन्न झालं नाही', असे आरोप वाझेने अनिल परब यांच्यावर केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT