मुंबई

''संजय राठोड मुख्यमंत्र्यांच्या हृदयात की, मुख्यमंत्री राठोडांच्या खिशात''

कृष्ण जोशी

मुंबई:  पूजा चव्हाण कथित आत्महत्या प्रकरणी मंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेतल्यानंतरही तो राज्यपालांकडे न पाठविल्याबद्दल भाजप नेते अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांवर खरमरीत टीका केली आहे. यावरून मुख्यमंत्री खोटारडे आहेत हेच सिद्ध होते, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. 

भाजपच्या जबरदस्त टीकेनंतर अखेर विधीमंडळ अधिवेशन सुरू होण्यापूर्वी रविवारी राठोड यांचा राजीनामा घेण्यात आला. मात्र बुधवारपर्यंत तो अजूनही राज्यपालांकडे पाठविण्यात आला नाही, अशी टीका भातखळकर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी वरील टीका करणारा व्हिडियो समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केली आहे. 

राजीनामा अद्यापही राज्यपालांकडे न गेल्यामुळे आता मुद्दा एवढाच आहे की संजय राठोड हे मुख्यमंत्र्यांच्या हृदयात आहेत की राठोड यांच्या खिशात मुख्यमंत्री आहेत, हा एकच प्रश्न आता महाराष्ट्राच्या जनतेला पडला आहे, असेही भातखळकर यांनी म्हटले आहे. 

राजीनामा राज्यपालांकडे न जाणे याचा अर्थ मुख्यमंत्री हे पुन्हा एकदा धडधडीतपणे खोटे बोलत आहेत आणि ते खोटारडे आहेत, हेच यावरून सिद्ध होत आहे, असाही टोला भातखळकर यांनी लगावला आहे. एवढे खोटे बोलणाऱ्या आणि महिलांविषयी असंवेदनशीलता प्रकट करणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा पक्षातर्फे निषेध करण्यात येत आहे. हा प्रश्न विधीमंडळातही उपस्थित केला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

मुळात पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर १८ दिवसांनी राठोड यांचा राजीनामा घेणे ही उशिरा केलेली कृती आहे, अशी टीकाही भातखळकर यांनी यापूर्वीच केली होती.

------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

BJP leader Atul Bhatkhalkar sharply criticized Chief Minister for sanjay rathod

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

G Ram Ji Bill: विरोधकांचा गोंधळ, घोषणाबाजी आणि कागदफाड... तरीही जी रामजी विधेयक लोकसभेत मंजूर; यात काय विशेष आहे?

Cameron Green: कॅमेरून ग्रीनच्या हाती TAX कापून किती रक्कम येणार? आधीच Welfare Fund मुळे ७.२० कोटी कापले जाणार...

Liam Livingstone ला १३ कोटी देण्याची खरच गरज होती का? काव्या मारनच्या निर्णयावर होतेय टीका, मोहम्मद शमीचं नाव ओढलं जातंय... कारण

Sangli Shaktipith : आधी इलेक्शन, मग नवे रेखांकन; शक्तिपीठ महामार्गावर सरकारची सावध पावले

कराचीतल्या या गल्लीत आजही बोलली जाते मराठी-कोकणी भाषा, पाकिस्तानात कुठून आले हे लोक?

SCROLL FOR NEXT