मुंबई

हा एक नवा हास्यास्पद प्रयोग; शरद पवार यांच्यावर टीका

हा केवळ हास्यास्पद प्रयोग; शरद पवार यांच्यावर टीका भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केलं ट्वीट (BJP Leader Keshav Upadhye criticize NCP Chief Sharad Pawar over Rashtra Manch meeting)

विराज भागवत

भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केलं ट्वीट

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी मंगळवारी राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रातील प्रमुख व्यक्तींची बैठक झाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आणि ‘राष्ट्रमंच’ या नावाखाली राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रातील प्रमुख व्यक्तींची बैठक असे याचे स्वरूप होते. अशा प्रकारे भाजपविरोधी नेते संपूर्ण देशातून एकत्र येत असल्याने आणि विशेष म्हणजे त्यात काँग्रेस किंवा शिवसेनेचे प्रतिनिधी नसल्याने राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या. शरद पवार यांच्या निकटवर्तीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘राष्ट्रमंच’ हे व्यासपीठ वरिष्ठ नेते यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) यांचे व्यासपीठ असून त्यांच्याच पुढाकारानेच ही बैठक झाल्याची माहिती आहे. या बैठकीबाबत भाजपचे मुख्य प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्वीट करत टीका केली. (BJP Leader Keshav Upadhye criticize NCP Chief Sharad Pawar over Rashtra Manch meeting)

"शरद पवार यांच्या दिल्लीतील घरी बैठक 20 जण उपस्थित असणाऱ्यांची यादी पहाता संभाव्य आघाडी हा राजकारणात जनाधार गमावलेल्या नेत्यांचा केवळ बातमीत राहण्यापुरता केविलवाणा प्रयत्न असून एक नवा हास्यास्पद प्रयोग यापलीकडे त्यातून काही निष्पन्न होणार नाही", असे ट्वीट करत त्यांनी शरद पवार व इतर नेत्यांवर टीका केली. तसेच, या बैठकीसाठी यशवंत सिंन्हा, पवन वर्मा, संजय सिंग, डी. राजा, फारुख अब्दुला, जस्टीस ए. पी. शाह, जावेद अखतर, के सी तुलसी, करन थापर, आशुतोष, माजीद मेमन, वंदना चव्हाण, एस वाय कुरेशी हे नेते उपस्थित असणार आहेत, असंही उपाध्ये यांनी ट्वीटद्वारे सांगितले.

दरम्यान, केवळ सोयीचे ठिकाण म्हणून पवार यांचे निवासस्थान निवडले आहे. स्वतः शरद पवार यांनी ही बैठक बोलावलेली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि महाराष्ट्रातील मंत्री नवाब मलिक यांनी या बैठकीत सहभागी होणाऱ्यांची यादी ट्विटद्वारे प्रसिद्ध केली. या बैठकीचे शिवसेनेला निमंत्रण नसल्याची प्राथमिक माहिती होती. शिवसेनेच्या नेत्याचे नाव निमंत्रितांच्या यादीत नव्हते. त्यामुळे महाविकास आघाडीतील सारं काही आलबेल आहे की नाही? याबद्दलच्या चर्चांना पुन्हा जोर आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT