मुंबई

"कोरोनाविरोधी ‘स्पिरीट’ असंच वाढवलं पाहिजे"; सरकारला टोला

भाजपचे केशव उपाध्ये यांनी ट्विटच्या माध्यमातून केली खोचक टीका

विराज भागवत

मुंबई: महाराष्ट्रात सध्या महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) विरूद्ध भाजप (BJP) असा सामना रंगल्याचे चित्र आहे. चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्याचा निर्णय असो किंवा दारूविक्रेत्यांबद्दल (Liquor) घेण्यात आलेले इतर निर्णय असोत, भाजपने राज्य सरकारला कायमच रोखठोक प्रश्न विचारले आहेत. सध्या चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदीचा विषय चांगलाच चर्चेत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी कायदा (Act) लागू आहे. पण तेथे अवैध दारूविक्रीला आळा घालण्यासाठी दारूबंदी उठवण्याचा निर्णय घेतला जात असल्याची चर्चा आहे. या आणि अशाच काही मुद्द्यावरून भाजपचे प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. (BJP Leader Keshav Upadhye sarcastically trolls Uddhav Thackeray led Mahavikas Aghadi)

"दारूबंदी उठवली, परीक्षा बंदी कायम.. दारूविक्रेत्यांची चिंता, महिला सुरक्षेचं तीनतेरा.. सुरापानाला प्रोत्साहन, दुधउत्पादक मात्र वाऱ्यावर.. आघाडीचे नेते सत्तेच्या नशेत, जनता मात्र हालात बेहोश.. कोरोनाविरोधी 'स्पिरीट' असंच वाढवलं पाहिजे, असं ठाकरे सरकारला वाटत असावं...", अशा शब्दात भाजपचे केशव उपाध्ये यांनी ठाकरे सरकारला टोला लगावला.

दरम्यान, जिल्ह्यात दारूबंदी करण्यासाठी श्रमिक एल्गारच्या ॲड. पारोमीता गोस्वामी यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी राज्यात काँग्रेसचे सरकार होते. तत्कालीन पालकमंत्री संजय देवतळे यांनी दारूबंदीचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडला होता. मात्र, या अहवालावर मंत्रिमंडळाने कोणताही निर्णय घेतला नाही. यानंतर भाजपचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आमची सरकार आल्यास चंद्रपुरात दारूबंदी करू असा शब्द दिला होता. निवडणुकीत भाजपचे सरकार निवडून आले आणि चंद्रपुरात दारूबंदी करण्यात आली. मात्र विद्यमान सरकारने ही बंदी काल उठवण्यात आली. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी यासंबंधी माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026: भारताला मिळालं ५ वं गोल्ड! नीरु ढंडाने एकाच दिवशी दोन पदकं जिंकून रचला इतिहास

Mumbai Protest: मुंबईत मातंग समाज आक्रमक! अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरणाच्या समर्थनात उग्र आंदोलन, पोलिसांचा लाठीचार्ज

Maharashtra Sugar Season 2026 : साखर कारखाने 15 ऑक्टोबरपूर्वीही सुरू करा, विरोध डावलून शासनाकडून परिपत्रक जारी; नवा संघर्ष पेटण्याची शक्यता

Marathi News Live Updates: मातंग समाजाचा मुंबईत मोर्चा; सीएसएमटी ते मंत्रालय मार्गावर रस्ता अडवण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड

Pune MLC Election: शिक्षक, पदवीधर’ची आजपासून रणधुमाळी ;दोन दिवसांत जागा वाटप; सहा ऑक्टोबर अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस

SCROLL FOR NEXT